सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील घोटी सिन्नर महामार्गावर भाजपा, शिवसंग्राम, रा.स.प, आर.पी.आय पक्षाच्यावतीने दुधाला सरसकट १० रु . लिटर अनुदान व दुध पावडरला प्रती किलो ५० रु . अनुदानाच्या मागणीसाठी शनिवारी(दि.१) महामार्गावरील शेनीत गावा नजीक आंदोलन करण्यात आले. घोषणा बाजी करत रस्त्यावर दूध ओतून निषेद करण्यात आला.भारतीय जनता पार्टी इगतपुरी तालुका, शिवसंग्राम, आर पी आय महायुतीच्या वतीने शेणीत फाटा येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेली ओमसाई डेअरीने कलेक्शन बंद केले.गायीच्या दुधाला प्रति लिटर १० रु पये अनुदान देण्यात यावे, तसेच दुध पावडरला ५० रु पये अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी सोमवार (दि.२० जुलै) रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने तहसीलदार इगतपुरी यांना निवेदन देण्यात आले होते, परंतु सरकारने यावर कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही या मुळे शनिवारी (दि.०१) आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात माजी आमदार शिवराम झोले, पांडुरंग बºहे, रमेश परदेशी, नंदू गाढवे, भाऊसाहेब कडभाणे, तानाजी जाधव, सागर हांडोरे, जगन भगत, महेश गाढव,खंडेराव झनकर, वैशाली आडके, प्रतीक्षा पाठक, आण्णा डोंगरे, कैलास कस्तुरे, बाळासाहेब जाधव, लालचंद पाटील, निखिल हंडोरे, भरत सहाणे, प्रफुल कुमट, विष्णु मालुंजकर, हनुमंत निसरड, पाल बंगड, संजय जाधव, विजय जाधव, राजाराम जाधव, संतोष कीरवे आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दूध दरवाढीसाठी घोटी सिन्नर हायवेवर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 18:24 IST
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील घोटी सिन्नर महामार्गावर भाजपा, शिवसंग्राम, रा.स.प, आर.पी.आय पक्षाच्यावतीने दुधाला सरसकट १० रु . लिटर अनुदान व दुध पावडरला प्रती किलो ५० रु . अनुदानाच्या मागणीसाठी शनिवारी(दि.१) महामार्गावरील शेनीत गावा नजीक आंदोलन करण्यात आले. घोषणा बाजी करत रस्त्यावर दूध ओतून निषेद करण्यात आला.
दूध दरवाढीसाठी घोटी सिन्नर हायवेवर आंदोलन
ठळक मुद्दे घोषणाबाजी : रस्त्यावर दूध ओतून निषेद करण्यात आला