उपोषणार्थी शिक्षकांचे आंदोलन चिघळले

By Admin | Updated: June 4, 2016 23:06 IST2016-06-04T22:39:22+5:302016-06-04T23:06:35+5:30

दोघांची प्रकृती खालावली : अनुदानाची मागणी

The agitation of teachers in the sub-district | उपोषणार्थी शिक्षकांचे आंदोलन चिघळले

उपोषणार्थी शिक्षकांचे आंदोलन चिघळले

नाशिकरोड : सर्वपात्र घोषित शाळांना तत्काळ अनुदान देण्यात यावे आदि मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय येथे सुरू केलेल्या साखळी धरणे आंदोलनात पाच जणांनी आमरण उपोषण केले असून, त्यातील दोघांची प्रकृती खालविल्याने त्यांना बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सर्वपात्र घोषित शाळांना तत्काळ अनुदान देण्यात यावे, सर्व अघोषित शाळा घोषित करण्यात याव्या, उच्च माध्यमिक शाळा घोषित करण्यात याव्यात या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर बुधवारपासून साखळी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. धरणे आंदोलनाच्या शनिवारी चौथ्या दिवशी एस. बी. शिरसाठ, साहेबराव कुटे, एस. बी. देशमुख, एम. एम. भोई, राजाराम गायकवाड, मोहन चकोर, जी.एस. ठाकरे, पांडुरंग देवरे, भाऊसाहेब शिरसाठ, जिभाऊ शिंदे, संजय देवरे, दशरथ आरोटे, एस. व्ही. देवरे आदिंसह शिक्षक सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The agitation of teachers in the sub-district