कळवणला कृषी विभागाचे आंदोलन

By Admin | Updated: August 13, 2014 00:40 IST2014-08-12T22:46:00+5:302014-08-13T00:40:54+5:30

निवेदन : ..तर आमरण उपोषण करण्याचा इशारा

Agitation of Agriculture Department | कळवणला कृषी विभागाचे आंदोलन

कळवणला कृषी विभागाचे आंदोलन

कळवण : तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील तांत्रिक संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी दि. ११ आॅगस्टपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार अनिल पुरे यांना सादर करण्यात आले.
शासनाने सात दिवसांच्या आत निर्णय न घेतल्यास मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे. कृषी संघटनेच्या मागण्यांसाठी महासंघाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत महासंघाशी संलग्न ५ केडर संघटनाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात येऊन ११ पासून बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाचा दुसरा दिवस असून, तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली.
आंदोलनात तालुका कृषी अधिकारी जितेंद्र शहा, मंडळ कृषी अधिकारी पी. जे. पाटील, कृषी पर्यवेक्षक आर. एम. निकम, के. एल. भरते, ए.जी. बागुल, के. डी. पटेल, बी.एच. थोरात, कृषी सहाय्यक एस. वाय. सावंत, एस.वाय. चव्हाण, आर. के. सावंत, ए. बी. भगत, योगेश वाघ, के. जी. पवार, एम. एस. नंदाळे, पी. एम. आहेर, अमोल पाटोळे एस. के. बहिरम आदि सहभागी झाले होते.

Web Title: Agitation of Agriculture Department