शुल्कविरोधात अभाविप आक्रमक

By Admin | Updated: June 29, 2017 00:26 IST2017-06-29T00:05:22+5:302017-06-29T00:26:50+5:30

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे बुधवारी (दि. २८) सेमिनार शुल्क रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.

Aggressive aggression against duty | शुल्कविरोधात अभाविप आक्रमक

शुल्कविरोधात अभाविप आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : क र्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय प्रशासन विद्यार्थ्यांकडून सक्तीने सेमिनार शुल्क आकारीत असल्याचा आरोप करीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे बुधवारी (दि. २८) सेमिनार शुल्क रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळी प्राचार्यांच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करून त्यांच्या खुर्चीला नोटांचा हार घालून ठिय्या आंदोलन केले.  कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रत्येक विद्यार्थ्याकडून सेमिनार शुल्कच्या नावाखाली सहा हजार रुपये शुल्क वसूल केले जात असून, याची कोणतीही रीतसर पावती दिली जात नसल्याचा आरोप करीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आक्रमक भूमिका घेत प्राचार्यांच्या दालनाबाहेर आंदोलन केले. महाविद्यालयाकडून वसूल केले जाणारे सेमिनार शुल्क हे शिक्षण शुल्क समितीच्या नियमात नसतानाही महाविद्यालय प्रशासन सक्तीने शुल्क वसुली करीत असल्याचा आरोप करीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने महाविद्यालय प्रशासनाविरोधात निषेध व्यक्त केला. संघटनेचे कार्यक र्ते व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात ‘छात्र शक्ती करे पुकार, वापस करो छे हजार’ अशा घोषणा देत सेमिनार शुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे.
 

Web Title: Aggressive aggression against duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.