मालेगावी मोसम नदीपात्रात पुन्हा माती उपसा सुरू

By Admin | Updated: July 19, 2014 21:15 IST2014-07-18T22:05:29+5:302014-07-19T21:15:46+5:30

मालेगावी मोसम नदीपात्रात पुन्हा माती उपसा सुरूएक कोटी रुपयांत या जागेचे सपाटीकरण करण्यासाठी देण्यात आल्याची चर्चा आहे

Again, soil fertility continues in Malegaavi seasonal river bed | मालेगावी मोसम नदीपात्रात पुन्हा माती उपसा सुरू

मालेगावी मोसम नदीपात्रात पुन्हा माती उपसा सुरू

मालेगावी मोसम नदीपात्रात पुन्हा माती उपसा सुरूएक कोटी रुपयांत या जागेचे सपाटीकरण करण्यासाठी देण्यात आल्याची चर्चा आहे. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या कामाची माहिती महसूल अधिकाऱ्यांना नाही हे म्हणणे धाडसाचे आहे. कारण या ठिकाणी संबंधित अधिकारी येऊन गेल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.उपशामुळे या ठिकाणी मोठे खड्डे झाले असून, परिसरात नदीपात्राशेजारी असलेल्या मनपाच्या पंपिंग स्टेशन व लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या कुंपनाचा आधार नष्ट झाल्याने त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असताना नदीची मालकी असणारे संबंधित पाटबंधारे खात्याचे अधिकारी या भागात फिरकले नसल्याची माहिती आहे.२८ मे रोजी लोकमतमध्ये
वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर खोदाई बंद करण्यात आली होती. संबंधित तलाठ्याने किंवा अधिकाऱ्याने सदर ठिकाणी भेट देऊन रिकाम्या जागेचा रीतसर पंचनामा केल्याचे वृत्त आहे.

Web Title: Again, soil fertility continues in Malegaavi seasonal river bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.