दीड वर्षानंतर ‘विहिरींना’ फुटणार पाझर

By Admin | Updated: June 20, 2014 01:19 IST2014-06-20T00:44:06+5:302014-06-20T01:19:00+5:30

८५ विहिरींची कामे मार्गी लावण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी महात्मा गांधी नाशिक : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अधिकाऱ्यांना दिले.

After a year and a half, the 'wells' can be broken | दीड वर्षानंतर ‘विहिरींना’ फुटणार पाझर

दीड वर्षानंतर ‘विहिरींना’ फुटणार पाझर

नाशिक : नियम डावलून काम केले तर ते बेकायदेशीर अन् काम न करताच पैसे काढले तर तो भ्रष्टाचार होतो, आम्ही तुम्हाला दीड वर्षापासून मंजूर असलेली कामेच करायचे तर सांगतो आहे, ते करा नाही तर गाठ आमच्याशी आहे, असा सज्जड दम आमदार माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा परिषदेच्या यंत्रणेला भरल्यानंतर सिन्नर पंचायत समितीअंतर्गत दीड वर्षापासून प्रलंबित असलेली सुमारे ८५ विहिरींची कामे मार्गी लावण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अधिकाऱ्यांना दिले.
सन २०१२-१३च्या कृती आराखड्यात सिन्नर तालुक्यातील दोडी, नांदूरशिंगोटे, कनकोरी, निऱ्हाळे, पांढुर्ली, पांगरी, आगासखिंड, बेलू, पंचाळे, मऱ्हळ, सुरेगाव या गावांतील सातशे ते आठशे ग्रामस्थांचे विहिरींचे प्रस्ताव ग्रामसभेत मंजूर करून ते सिन्नर पंचायत समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले.
गेल्या एक-दीड वर्षापासून ते प्रस्ताव मंजुरीसाठी पडून होते. त्यातच नव्याने तयार करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कृती आराखड्यात या प्रस्तावांचा समावेश नसल्याने संतापलेले पंचायत समिती सभापती बाळासाहेब वाघ यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांची भेट घेऊन त्यांना सिन्नर पंचायत समितीतील विस्तार अधिकारी सोनू अहिरे व प्रभारी गटविकास अधिकारी सुनील अहिरे यांच्या कामकाजाबाबत तक्रार केली. आमदार कोकाटे यांनी तर आम्ही तुम्हाला काहीही बेकायदेशीर कामे करण्यास सांगत नसून ग्रामसभेने निवडलेल्या लाभार्थ्यांना तत्काळ त्यांच्या योजनेचा लाभ देण्याचा
आग्रह धरीत असल्याचे
सांगितले.
सुखदेव बनकर यांनी शासन निर्णयाची माहिती घेऊन याबाबत तोडगा काढण्यासाठी रोहयो उपजिल्हाधिकारी जी. एम. गाडगीळ यांच्याशी चर्चा केली. अखेर शासन निर्णयानुसार आधीच्या ग्रामसभेत निवड केलेल्या लाभार्थ्यांना लाभ देता येतो, असे स्पष्ट झाल्याने बनकर यांनी पंचायत समिती कर्मचाऱ्यांना त्यानुसार प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.
यावेळी सभापती राजेश नवाळे, पंचायत समिती सदस्य रामदास खुळे, प्रकाश कदम आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: After a year and a half, the 'wells' can be broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.