दीड वर्षानंतर वकिलांनी ओलांडला चेंबरचा उंबरठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST2021-07-07T04:17:20+5:302021-07-07T04:17:20+5:30
नाशिक जिल्हा व तालुका न्यायालयाच्या आवारातील वकिलांच्या चेंबरचे प्रवेशद्वार साेमवारी खुले करण्यात आले. यासाठी नाशिक वकील संघाला थेट उच्च ...

दीड वर्षानंतर वकिलांनी ओलांडला चेंबरचा उंबरठा
नाशिक जिल्हा व तालुका न्यायालयाच्या आवारातील वकिलांच्या चेंबरचे प्रवेशद्वार साेमवारी खुले करण्यात आले. यासाठी नाशिक वकील संघाला थेट उच्च न्यायालयात पाठपुरावा करावा लागला. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत बार रुम खुले राहणार आहे. काेरोनाच्या पहिल्या लाटेपासून न्यायालयीन आवारात वकीलवर्गासह पक्षकारांना प्रवेशावर मर्यादा आल्या होत्या. न्यायालयाच्या आदेशानंतर विविध अटी-शर्तीनुसार वकिलांचे बार रुम उघडण्याची परवानगी जिल्हा व प्रधान सत्र न्यायालयाकडून मिळाली आहे. आता प्रत्येक चेंबरमध्ये ५० टक्के उपस्थिती असणे गरजेचे आहे. या बार रुम्समध्ये वकिलांना डबल मास्क व वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच सोशल डिस्टन्स राखणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. चेंबरमध्ये पक्षकारांची गर्दी होऊ देऊ नये, जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता येणे शक्य होईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.