शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नुतन खासदार वाजे, बच्छाव दिल्लीला, गोडसे यांचा प्रलंबीत कामांचा पाठपुरावा सुरू; रणधुमाळी थांबली, कामांना सुरूवात

By संजय पाठक | Updated: June 8, 2024 18:36 IST

नाशिक लाेकसभा मतदार संघातून शिंदे सेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा पराभव करून उध्दव सेनेचे राजाभाऊ वाजे निवडून आले.

नाशिक- लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राजकीय रणधुमाळी संपल्याने नाशिकचे नुतन खासदार राजाभाऊ वाजे आणि नाशिक निवासी धुळ्याच्या खासदार डॉ. शाेभा बच्छाव यांनी पक्षीय बैठका आणि नेांदणीसाठी दिल्ली गाठली आहे. दुसरीकडे पराभूत उमेदवार हेमंत गोडसे यांनी झाले गेले ते विसरून पुन्हा आपल्या कार्यास प्रारंभ केला आहे. उद्योजकांशी संपर्क साधून त्यांनी उद्योग मंत्र्यांकडे बैठक घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

नाशिक लाेकसभा मतदार संघातून शिंदे सेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा पराभव करून उध्दव सेनेचे राजाभाऊ वाजे निवडून आले. तर धुळ्यात भाजपाचे उमेदवार व माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा पराभव करून नाशिकच्या मध्ये राहणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव या निवडून आल्या. निकालानंतर वाजे नुतन खासदार म्हणून रजिस्ट्रेशनसह काही कामे करण्यासाठी ते दिल्लीस रवाना झाले तर डॉ. शोभा बच्छाव  शनिवारी दिल्ली येथे काँग्रेस पक्षाच्या खासदारांच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी रवाना झाल्या.

या सर्व घडामोडीत हेमंत गोडसे यांनी आपल्या पराभवाचा विषय दुर सारून नियमीत संपर्क आणि कामे करण्यास प्रारंभ केला आहे. उद्योजकांशी संपर्क साधून त्यांनी राजूर बहुला येथील प्रस्तावित एमआयडीसीचे काम तसेच सीपेटच्या कामासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. जी कामे अंतिम टप्प्यात आणली ती मार्गी लावण्याचे काम सध्या करीत असल्याचे गोडसे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपा