शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ढकांबे येथील  विवाहितेच्या आत्महत्येनंतर सासरच्यांना चोपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:53 IST

चार महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या ढकांबे येथील नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़२८) घडली़ सोनाली गोकूळ बोडके, असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून, सासरच्या छळास कंटाळूनच मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप करून माहेरच्यांनी सासरच्यांना जिल्हा रुग्णालयात मारहाण केली़

नाशिक : चार महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या ढकांबे येथील नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़२८) घडली़ सोनाली गोकूळ बोडके, असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून, सासरच्या छळास कंटाळूनच मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप करून माहेरच्यांनी सासरच्यांना जिल्हा रुग्णालयात मारहाण केली़ याप्रकरणी सोनालीचा पती गोकुळ कैलास बोडके, सासू सुनीता बोडके, दीर अजित बोडके व आजेसासरे मनोहर बोडके (सर्व रा. ढकांबे, ता. दिंडोरी, जि. नाशिक) यांच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  सिन्नर तालुक्यातील सोनगिरी येथील सोनाली सोमनाथ लहाने (१९) हिचा दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथे राहणाऱ्या गोकुळ बोडके याच्याशी ४ मे २०१८ रोजी नांदूर नाक्यावरील एका लॉन्समध्ये झाला होता. दरम्यान, लग्नाच्या वेळी संशयित बोडके कुटुंबाने सोनालीकडे दोन तोळे सोन्याची साखळी व अंगठीची मागणी केली; मात्र गरिबी असल्याने सोनालीच्या कुटुंबाने बोडके यांची इच्छा पूर्ण केली नाही. सोनालीचे लग्न तिचे मामा बाळू रंगनाथ धात्रक (रा. ढकांबे) यांनी स्वखर्चाने करून दिले, तर या लग्नात एकूण सहा लाख रुपयांचा खर्च केला. दरम्यान, लग्नानंतर सोनाली गोकुळ बोडके ही दोन दिवसांसाठी माहेरी परत आली. यानंतर तिने तिच्या आईला सासरच्यांकडून शारीरिक व मानसिक छळ होत असल्याची कल्पना दिली, तर सोनालीचा पती गोकुळ कैलास बोडके, सासू सुनीता कैलास बोडके, दीर अजित कैलास बोडके व आजेसासरे मनोहर दामोदर बोडके यांनी सोनालीच्या अंगावरील सोन्याची मोहनमाळ, नेकलेस व कानातील दागिने काढून घेतले होते, तर तिचा मोबाइल फोनसुद्धा काढून घेतला होता, तर सोनालीच्या कुटुंबीयांनी तिला केव्हाही फोन केला असता तिचे सासरचे मोबाइलचा स्पीकर आॅन करून बोलण्यास सांगत होते, तर सासू सुनीता बोडके ही सोनालीला नेहमी कामकाजावरून मारहाण करीत होती.संशय व्यक्तसासरच्या या छळास कंटाळून सोनालीने ढकांबे येथे गळफास लावून घेत आत्महत्या केली. दरम्यान, सोनालीची आई लता लहाने यांनी सोनालीला दवाखान्यात आणणारे संशयित कांतीलाल मनोहर बोडके, नितीन संपत बोडके (दोघे रा. ढकांबे) व विजय धात्रक (रा. आशेवाडी, ता. दिंडोरी) यांच्यावरही संशय व्यक्त केला आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी