व्यक्ती मृत झाल्यानंतर जमिनीची बनावट विक्रीं
By Admin | Updated: February 3, 2016 22:27 IST2016-02-03T22:25:45+5:302016-02-03T22:27:44+5:30
व्यक्ती मृत झाल्यानंतर जमिनीची बनावट विक्रीं

व्यक्ती मृत झाल्यानंतर जमिनीची बनावट विक्रीं
सिन्नर : वडिलांच्या मृत्यूनंतर त्या जागी दुसऱ्या व्यक्तीला उभे करून चुलत्यांनी सहा गुंठे जमिनीची बनावट विक्री केल्याची तक्रार पाटोळे येथील अशोक हौशीराम खताळे यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पाटोळे येथील अशोक खताळे यांची वडिलोपार्जित शेतजमीन आहे. त्यांचे वडील हौशीराम खंडू खताळे यांचा २२ जानेवारी २००१ ला मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांच्या मुलांची वारस म्हणून नोंद झाली. तीन महिन्यानंतर गट क्र. ४५४ मधील सहा गुंठे जमिनीची विक्री झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत खरेदीदार दत्तात्रय खताळे यांनी अशोक खताळे यास शेतजमिनीतून ट्रॅक्टर नेण्यास मज्जाव केल्यानंतर खरेदीचा प्रकार उघडकीस आला. हौशीराम खताळे यांचा २२ जानेवारी २००१ ला मृत्यू झाल्यानंतर ३० एप्रिल रोजी या जमिनीचे खरेदी खत झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे फसवणूक झाल्याची तक्रार अशोक खताळे यांनी केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी बहिरू
खंडू खताळे, एकनाथ खंडू खताळे, भागवत खंडू खताळे, भास्कर खंडू खताळे, दत्तू धनु खताळे, मच्छिंद्र बहिरु खताळे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)