त्र्यंबकराजाच्या पालखी नंतर देवस्थानाचा बैल पोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:19 IST2021-09-07T04:19:20+5:302021-09-07T04:19:20+5:30

इन्फो गाजरे यांच्या बैलांना मान देवस्थान ट्रस्टकडे स्वत:चे बैल नाहीत. त्यामुळे विष्णुपंत गाजरे यांच्या बैलांना दरवर्षी देवस्थान मान ...

After the palanquin of Trimbakaraja, the bull of the temple hive | त्र्यंबकराजाच्या पालखी नंतर देवस्थानाचा बैल पोळा

त्र्यंबकराजाच्या पालखी नंतर देवस्थानाचा बैल पोळा

इन्फो

गाजरे यांच्या बैलांना मान

देवस्थान ट्रस्टकडे स्वत:चे बैल नाहीत. त्यामुळे विष्णुपंत गाजरे यांच्या बैलांना दरवर्षी देवस्थान मान देते. त्यानुसार पालखी सोहळा झाल्यावर वाजंत्रीच्या तालावर विष्णुपंत गाजरे आणि प्रदीप गाजरे यांनी सर्वप्रथम देवस्थानच्या वतीने मानाचे बैल मिरविले. देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयासमोर बैलांची पूजा करुन त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला. त्यानंतर गावातील अन्य बैलांच्या सवाद्य मिरवणुका निघाल्या. बैलांना श्रीहनुमानाच्या दर्शनासाठी नेण्यात आले.

इन्फो

मालिकेतील कलावंतांची हजेरी

त्र्यंबकराजाच्या पालखी सोहळ्याला भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी ‘देवमाणूस’ या मालिकेमधील कलाकार प्रतीक्षा जाधव, सागर कुऱ्हाडे, ‘कारभारी लय भारी’ मालिकेतील रश्मी पाटील हे कलावंत आले होते. त्यांना पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. या कलावंतांनी त्र्यंबकराजाचे बाहेरून दर्शन घेत पूजा अभिषेक केला.

फोटो- ०६ त्र्यंबक पालखी

त्र्यंबकेश्वर येथे अखेरच्या पाचव्या श्रावण साेमवारी काढण्यात आलेली त्र्यंबकराजाची पालखी.

फोटो- ०६ त्र्यंबक पालखी - २

060921\06nsk_38_06092021_13.jpg~060921\06nsk_39_06092021_13.jpg

फोटो- ०६ त्र्यंबक पालखी ~फोटो- ०६ त्र्यंबक पालखी - २ 

Web Title: After the palanquin of Trimbakaraja, the bull of the temple hive