शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिन्यानंतरही प्रवेशाचा घोळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 01:08 IST

शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये प्राथमिक शाळा १५ जूनलाच सुरू झाल्या असून, शाळा सुरू होऊन सुमारे दीड महिन्याचा कालावधी उलटत आल्यानंतरही आरटीई प्रवेशाचा घोळ सुरू आहे.

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये प्राथमिक शाळा १५ जूनलाच सुरू झाल्या असून, शाळा सुरू होऊन सुमारे दीड महिन्याचा कालावधी उलटत आल्यानंतरही आरटीई प्रवेशाचा घोळ सुरू आहे. आरटीई प्रवेशाची तिसरी सोडत जाहीर झाल्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सुरुवातीला १८ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. या विहित मुदतीत अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण होऊ न शकल्याने शिक्षण विभागाने प्रवेशासाठी २४ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४ हजार २२२ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत, तर नाशिकसह राज्यभरात ७५ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत.आरटीई प्रवेशासाठी पडताळणी समितीकडे जाऊन आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य करण्यात आले आहे. आतापर्यंत नाशिक शहर व जिल्ह्यातील ४ हजार २२२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. शिक्षणहक्क कायद्यानुसार (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेश दिला जातो. दरवर्षी डिसेंबरमध्ये सुरू होणारी ही प्रक्रिया यंदा फेब्रुवारीच्या उत्तरार्धात सुरू झाली. त्यानंतर एप्रिलच्या दुसºया आठवड्यात पहिली सोडत जाहीर करण्यात आली. पहिल्या सोडतीनंतर प्रवेश घेण्यास दोनदा मुदतवाढ देण्यात आली. त्यातही महिनाभराचा कालावधी गेल्याने पहिल्या सोडतीनंतर तब्बल दोन महिने उलटल्यानंतर दुसरी सोडत जाहीर करण्यात आली. आरटीईच्या दुसºया सोडतीत ३६५ शाळांत दोन हजार ३७ मुलांची निवड झाली होती. त्यातील १ हजार १८८ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले. प्रवेशापासून हजारो विद्यार्थी वंचित राहिल्याने तिसरी सोडत जाहीर करण्यात आली. त्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती पालकांना एमएसएसद्वारे तसेच संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आली. पडताळणी समितीकडे जाऊन २० जुलैपर्यंत सुमारे ४ हजार २२२ विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहे.अर्ज अडीच लाख प्रवेश केवळ ७५ हजारआरटीईच्या राज्यभरात ९ हजार १९५ शाळा असून, त्यात १ लाख १६ हजार ८०८ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी तब्बल २ लाख ४५ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील पहिल्या तिन्ही फेऱ्यांमध्ये केवळ १ लाख २४ हजार विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यापैकी केवळ ७५ हजार ६४९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थी