शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जनक्षोभानंतर आमदारद्वयी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:51 IST

महापालिकेकडून सिडकोतील वाढीव बांधकामे हटविण्यासाठी रेखांकनाचे काम सुरू झाल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत असतानाच गेल्या तीन-चार दिवसांपासून मतदारसंघात न फिरकणारे हिरे आमदारद्वयी जनक्षोभ पाहून रस्त्यावर उतरले. यावेळी सिडकोवासीयांसाठी मनपाच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी आमदार सीमा हिरे व आमदार अपूर्व हिरे यांनी दर्शविली आहे.

सिडको : महापालिकेकडून सिडकोतील वाढीव बांधकामे हटविण्यासाठी रेखांकनाचे काम सुरू झाल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत असतानाच गेल्या तीन-चार दिवसांपासून मतदारसंघात न फिरकणारे हिरे आमदारद्वयी जनक्षोभ पाहून रस्त्यावर उतरले. यावेळी सिडकोवासीयांसाठी मनपाच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी आमदार सीमा हिरे व आमदार अपूर्व हिरे यांनी दर्शविली आहे.  सिडको भागात गेल्या काही दिवसांपासून पालिकेतर्फे अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली असून, रहिवासी भागातील अतिक्रमणेही काढण्यासाठी मनपाच्या वतीने डिमार्केशन करण्यात येत आहे. १ जूननंतर कधीही रहिवासी भागातील अतिक्रमणांवर हतोडा पडणार असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आल्याने सिडकोवासीयांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. अखेर जनक्षोभ पाहून आमदार सीमा हिरे व आमदार डॉ. अपूर्व हिरे यांना रस्त्यावर उतरावे लागले. दोन्हीआमदारांनी डिमार्केशन केलेल्या भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधला.  यावेळी आमदार हिरे यांनी सांगितले की, महापालिका आयुक्तांकडून या बांधकामास अनधिकृत ठरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अतिक्रमणाला स्थगिती देण्याचे अधिकार हे महापौरांना असून, त्यांनी त्याबाबत दखल घ्यावी. महापालिकेच्या विरोधात जनहित याचिका दाखल करणार आहेत. अतिक्रमणविरोधात लढा देण्यासाठी अतिक्रमण बचाव कृती समितीची स्थापना करणार असल्याची माहिती आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.मुख्यमंत्र्यांना घालणार साकडेअतिक्रमणाच्या मुद्द्यावरून आमदार सीमा हिरे यांनीदेखील रायगड चौक, तानाजी चौक परिसरात नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. मनपाने या घरांवर वरवंटा फिरवण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. आपण याबाबत मुख्यमंत्री यांची वेळ घेऊन सिडकोवासीयांच्या भावना त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे आमदार सीमा हिरे यांनी यावेळी नागरिकांना सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMLAआमदार