बिबट्या हल्ल्यानंतर निफाड येथे बैठक
By Admin | Updated: September 28, 2014 23:29 IST2014-09-28T23:29:43+5:302014-09-28T23:29:55+5:30
बिबट्या हल्ल्यानंतर निफाड येथे बैठक

बिबट्या हल्ल्यानंतर निफाड येथे बैठक
निफाड : निफाड तालुक्यातील जळगाव, कोठुरे, काथरगाव, कुरूडगाव परिसरातील शेतीवस्तीतील नागरिकांवर बिबट्यांनी जे हल्ले केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर निफाड पोलीस ठाण्यात संबंधित गावचे नागरिक, पोलीस अधिकारी व वनविभागाचे कर्मचारी यांची एकत्रित बैठक घेण्यात आली.
या बैठकीस निफाड पंचायत समितीचे सभापती सुभाष कराड, जळगावचे उपसरपंच सुधीर कराड, पुंजाहारी काळे, मारुती सांगळे, विश्वनाथ वाघ, सुदाम सांगळे, रतन चकोर, दिनकर कातकाडे, बिबट्याच्या हल्ल्यातून बचावलेले सुभाष काळे, योगेश कराड, बाळासाहेब कराड तसेच पोलीस निरीक्षक दिलीप निघोट, वनविभागाचे अधिकारी भामरे, जाधव आदि उपस्थित होते.(वार्ताहर)
बिबट्यांचे वास्तव्य जळगाव, कोठुरे, काथरगाव, कुरुडगाव परिसरात वाढलेले असून, बिबट्यांनी परंपरांगत हल्ल्याबरोबर मोटारसायकलस्वारांवर रात्रीच्या सुमारास हल्ले वाढले असून, या गावाच्या परिसरात वनविभागाने पिंजरे संख्येने जास्त लावावे. पोलीस पेट्रोलिग रात्री सुरू करावी आदि मागण्या उपस्थितांनी याप्रसंगी केल्या. या गावच्या शेतीवस्तीत पिंजरे अधिक संख्येने लावून पोलीसांची गस्त चालू करण्यात येईल, असे आश्वासन उपस्थित अधिकाऱ्यांनी दिले.
संध्याकाळी ७ ते ८ च्या दरम्यान चारच दिवसात बिबट्यांनी मुख्य रस्त्याच्या कडेला दबा धरून मोटारसायकलस्वारावर हल्ले करण्याच्या दोन घटना कोठुरे, कुरुडगाव येथे घडल्या असून, असे हल्ले निफाडकरांना नवीन असल्याने हा संशोधनाचा विषय ठरला आहे.