पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर चक्री बससेवा सुरू
By Admin | Updated: May 7, 2015 23:42 IST2015-05-07T23:41:42+5:302015-05-07T23:42:09+5:30
पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर चक्री बससेवा सुरू

पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर चक्री बससेवा सुरू
इंदिरानगर : निमाणी ते राणेनगर गजानन महाराज मार्गे चक्री बससेवा अखेर सुरू झाली. या चक्री बससेवेचा शुभारंभ आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
गजानन महाराज रस्त्यालगत अपार्टमेंट आणि सोसायट्या वाढत आहेत. परंतु, गेल्या दहा वर्षांत या मार्गावरील बसफेऱ्या कमी झाल्यामुळे विद्यार्थीवर्ग, नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. तसेच पाच वर्षांपासून चक्री बससेवेची मागणी धूळखात पडूून होती. यासाठी नवीन नाशिक प्रवासी संघटना, कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघ व मोदकेश्वर सेवा ट्रस्ट यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
सदर बससेवा सुरू करण्याबाबत परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी वारंवार पाठपुरावा केला होता.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, सुहास फरांदे, सुरेश पाटील, विभागीय नियंत्रक योगिनी जोशी, सुजाता करंजीकर, राजश्री शौचे, श्रीकांत बापट, मंगेश नागरे, संगीता पाळेकर, पांडुरंग वाणी आदिंसह नागरिक उपस्थित होते.