मूठभर चांदण्यांनंतर आता ‘ढीगभर’ पुस्तके चर्चेत पुस्तकांच्या वर्गणीची कार्यकारी अभियंत्यांकडून वसुली?
By Admin | Updated: November 12, 2014 01:10 IST2014-11-12T01:09:55+5:302014-11-12T01:10:49+5:30
मूठभर चांदण्यांनंतर आता ‘ढीगभर’ पुस्तके चर्चेत पुस्तकांच्या वर्गणीची कार्यकारी अभियंत्यांकडून वसुली?

मूठभर चांदण्यांनंतर आता ‘ढीगभर’ पुस्तके चर्चेत पुस्तकांच्या वर्गणीची कार्यकारी अभियंत्यांकडून वसुली?
नाशिक : राज्यातील आघाडी सरकारशी जवळीक साधून असलेल्या आणि निवडणुकीच्या रिंगणातही उतरलेल्या एका नेत्याच्या कार्यकर्त्याने एड्सविषयक जनजागृती करणारे पुस्तक काढल्याची (न छापलेले) व त्याच्या शेकडो प्रती चक्क कार्यकारी अभियंत्यांच्या माथी मारून त्यांच्याकडूनच ‘जनजागृती’ करण्याची अजब शक्कल लढविल्याची जिल्हा परिषदेच्या वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा आहे. जिल्हा परिषदेत काही वर्षांपूर्वी शिक्षण विभागात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन (?) होईल असे ‘मूठभर चांदण्या’ नामक पुस्तक घेण्याबाबत शासनस्तरावरून एक पत्र आल्याची चर्चा होती. त्यावेळी हे पुस्तक बरेच गाजलेही होते. आताही जिल्हा परिषदेत कसमा पट्ट्यातील एक डॉक्टर (?) म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीचा मागील काळात चांगलाच वावर होता. या डॉक्टरांचे एचआयव्ही अर्थात एड्स आजाराच्या जनजागृतीबाबत कार्य असल्याची चर्चा आहे. एड्स निर्मूलनासाठी राज्य सरकारच नव्हे, तर केंद्र सरकार तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरही निधीची अन् अनुदानाची कमतरता नाही. अशातच या कसमा पट्ट्यातील डॉक्टरच्या ‘मोर’पंखी स्वभावामुळे जिल्हा परिषदेत त्यांच्या मित्र असलेल्या नेत्यांची संख्या बऱ्यापैकी होती.