आचारसंहितेनंतरची महासभाही तहकूब

By Admin | Updated: May 21, 2014 00:36 IST2014-05-21T00:02:14+5:302014-05-21T00:36:54+5:30

नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर महापालिकेची प्रथमच झालेली महासभा मान्यवरांच्या निधनामुळे शोकप्रस्ताव संमत करून तहकूब करण्यात आली.

After the code of conduct, the Mahasabha will be adjourned | आचारसंहितेनंतरची महासभाही तहकूब

आचारसंहितेनंतरची महासभाही तहकूब

नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर महापालिकेची प्रथमच झालेली महासभा मान्यवरांच्या निधनामुळे शोकप्रस्ताव संमत करून तहकूब करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली होती. ती अधिकृतरीत्या सोमवारी संपुष्टात आली. त्यामुळे दोन मासिक महासभा तहकूब करण्यात आल्या. आदर्श आचारसंहितेचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर आज प्रथमच महासभा झाली. महापौर ॲड. यतिन वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत अनेक मान्यवरांच्या निधनामुळे शोकप्रस्ताव मांडण्यात आला. राष्ट्रवादीच्या नगरसेवक सुनीता निमसे यांचे पती अशोक निमसे, माजी नगरसेवक सीमा बडदे यांचे चिरंजीव स्वप्नील बडदे, भाजपाचे माजी शहराध्यक्ष नितीनभाई जोशी, माजी नगराध्यक्ष गुलाम मोहमद जीन, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या आई परिघाबाई पानगव्हाणे, शिक्षणतज्ज्ञ बेजॉन देसाई, आदर्श शिक्षिका आशाताई पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करून महासभा तहकूब करण्यात आली.

Web Title: After the code of conduct, the Mahasabha will be adjourned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.