सिन्नर : गाव बंद करून जेजुरीला कुलदैवतेच्या दर्शनासाठी गेलेल्या मºहळकरांचे पाच दिवसांनंतर मंगळवारी रात्री पांगरी येथे आगमन झाले. तत्पूर्वी सुरेगाव व मºहळ मार्गे आलेल्या पालखीचे ग्रामस्थांनी भक्तिभावाने स्वागत करीत पालखीची मिरवणूक काढण्यात आली.मºहळ खुर्द, मºहळ बुद्रुक व सुरेगाव या गावांतील ग्रामस्थ घरांना कुलूप लावून गावातील मंदिरातील देव घेऊन जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यांचे मंगळवारी सुरेगाव व त्यानंतर पांगरी येथे आगमन झाले. ‘याचि देही याचि डोळा’ देवभेटीचा सोहळा पाहण्याचा योग आल्याने मºहळकरांच्या डोळ्यात कृतार्थतेचे भाव दिसून येत होते.शनिवारी (दि. १२) आळंदी येथे मुक्काम केल्यानंतर शनिवारी व रविवारी मºहळकरांचा जेजुरीत मुक्काम झाला होता. या दिवशी बरोबर नेलेल्या रथामध्ये पालखीत घोड्यावर स्वार झालेल्या खंडोबारायाच्या ‘श्री’च्या मूर्तीला कºहा नदीच्या घाटावर सनई-चौघड्याच्या मंगल सुरात गंगास्नान घातल्यानंतर पालखी वाजतगाजत कडेपठारावर नेण्यात आली होती. जेजुरी गडावर पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर मºहळचे कुलदैवत मूळ पीठाला भेटल्यानंतर हजारो भाविकांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष करीत दर्शन घेतले. हा देवभेटीचा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला.त्यानंतर पालखीचा परतीचा प्रवास सुरू झाला. सोमवारी (दि. १४) देहू येथे पालखीचा मुक्काम झाला. मंगळवारी सकाळी पालखी व वाहनाचा ताफा देहू येथून मºहळकडे परतीच्या प्रवासाला निघाला होता. मºहळमार्गे पालखी पांगरीकडे मुक्कामासाठी रवाना झाली. बुधवारी (दि. १६) सकाळी पांगरी व मºहळ येथे मिरवणूक काढण्यात येणार आहे. शुक्रवार, दि. ११ रोजी मºहळ खुर्द, मºहळ बुद्रुक व सुरेगाव येथील सुमारे आठ हजार भाविक कुलदैवताच्या दर्शनासाठी सुमारे ८०० वाहनांच्या ताफ्यासह जेजुरीला गेले होते. या गावातील ग्रामस्थ कधी एकट्या- दुकट्याने किंवा कुटुंबासह जेजुरीला जात नाहीत, तर सर्व ग्रामस्थ एकाच वेळी आपल्या घरांना टाळा ठोकून पालखीची देवभेट घडविण्यासाठी जेजुरीला जात असतात. गेल्या अनेक वर्षांपासून व पिढ्यांपासून मºहळकरांनी कुलदैवतेच्या भेटीची आपली ही आगळीवेगळी परंपरा जपली आहे.
देवभेटीच्या सोहळ्यानंतर मºहळकरांचा पांगरी मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:55 IST
सिन्नर : गाव बंद करून जेजुरीला कुलदैवतेच्या दर्शनासाठी गेलेल्या मºहळकरांचे पाच दिवसांनंतर मंगळवारी रात्री पांगरी येथे आगमन झाले. तत्पूर्वी सुरेगाव व मºहळ मार्गे आलेल्या पालखीचे ग्रामस्थांनी भक्तिभावाने स्वागत करीत पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
देवभेटीच्या सोहळ्यानंतर मºहळकरांचा पांगरी मुक्काम
ठळक मुद्देजेजुरीची वारी : पालखीचे जोरदार स्वागतमºहळकरांचे पाच दिवसांनंतर मंगळवारी रात्री पांगरी येथे आगमन झाले