शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

अनधिकृत धार्मिक स्थळ जमीनदोस्त केल्यानंतर  द्वारकावरील ‘कॉर्नर’ मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 01:11 IST

महापालिकेने न्यायालयाच्या निर्देशानुसार, द्वारका सर्कलवरील अनधिकृत धार्मिक स्थळ जमीनदोस्त केल्यानंतर कॉर्नर मोकळा झाला असून, त्यामुळे नाशिक-पुणारोडवरून येणाºया वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. मागील महिन्यात पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर राबविलेली  ‘यू-टर्न’ योजना सपशेल अयशस्वी ठरल्यानंतर, पोलिसांनी पुण्याहून येणाºया अवजड वाहनांना सदर धार्मिक स्थळाजवळ डावे वळण घेताना अडचणी आल्याचे निरीक्षण नोंदविले होते. आता धार्मिक स्थळ हटल्यानंतर रस्त्यातील वृक्ष आणि वनविभागाचे गुदाम हटविण्याची कार्यवाही महापालिकेला पार पाडावी लागणार असून, साडेचार एकर परिसरात उभ्या राहिलेल्या अनधिकृत गाळ्यांचाही प्रश्न निकाली काढण्याचे आव्हान समोर आहे.

ठळक मुद्दे वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत ‘यू-टर्न’ योजना सपशेल अयशस्वीअनधिकृत गाळ्यांचा प्रश्न निकाली काढण्याचे आव्हान

नाशिक : महापालिकेने न्यायालयाच्या निर्देशानुसार, द्वारका सर्कलवरील अनधिकृत धार्मिक स्थळ जमीनदोस्त केल्यानंतर कॉर्नर मोकळा झाला असून, त्यामुळे नाशिक-पुणारोडवरून येणाºया वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. मागील महिन्यात पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर राबविलेली  ‘यू-टर्न’ योजना सपशेल अयशस्वी ठरल्यानंतर, पोलिसांनी पुण्याहून येणाºया अवजड वाहनांना सदर धार्मिक स्थळाजवळ डावे वळण घेताना अडचणी आल्याचे निरीक्षण नोंदविले होते. आता धार्मिक स्थळ हटल्यानंतर रस्त्यातील वृक्ष आणि वनविभागाचे गुदाम हटविण्याची कार्यवाही महापालिकेला पार पाडावी लागणार असून, साडेचार एकर परिसरात उभ्या राहिलेल्या अनधिकृत गाळ्यांचाही प्रश्न निकाली काढण्याचे आव्हान समोर आहे.  द्वारका सर्कलवरील नित्याची बनलेली वाहतूक कोंडी ही महापालिका आणि पोलीस यंत्रणेची मोठी डोकेदुखी ठरली आहे. पोलिसांनी मागील महिन्यात सर्कलवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘यू-टर्न’चा प्रयोग राबविला होता. परंतु, वाहतूक कोंडी फुटण्याऐवजी ती अधिकच वाढू लागल्याने काही तासांतच पोलिसांना ही योजना गुंडाळावी लागली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच महापालिका आयुक्तांच्या दालनात झालेल्या मोबॅलिटी सेलच्या बैठकीत पोलिसांच्या या ‘यू-टर्न’ योजनेच्या अपयशावर चर्चा झाली होती. त्यात वाहतूक शाखेच्या प्रतिनिधीने, पुण्याहून येणाºया अवजड वाहनांना मारुती मंदिराजवळ डावे वळण घेताना अडचणी आल्या. जोपर्यंत डाव्या वळणाच्या ठिकाणी असलेले अतिक्रमण हटत नाही तोपर्यंत वाहतूक कोंडी फुटू शकत नसल्याचे स्पष्ट केले होते. गाळेधारकांनाही हटविण्याचे आव्हान द्वारका सर्कललगत महापालिकेचा साडेचार एकर भूखंड असून, या भूखंडावर सुमारे ७५ व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने त्याबाबतचा वाद न्यायप्रविष्ट आहे. चार महिन्यांपूर्वी आमदार देवयानी फरांदे यांनी पुढाकार घेत गाळेधारकांची बैठक आयुक्तांसमवेत घडवून आणली होती. त्यावेळी व्यावसायिकांनी महापालिकेने सदर जागेवर व्यापारी संकुल उभारल्यास त्याठिकाणी गाळे उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. परंतु, व्यावसायिकांनी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला असल्याने सदर दाव्याचा निकाल लागेपर्यंत प्रतीक्षा करण्याची तयारी महापालिकेने ठेवल्याने गाळेधारकांची पंचाईत झाली. दरम्यान, आता गाळेधारकांचेही अतिक्रमण हटविण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर असून, महापालिकेच्या बाजूने निकाल लागल्यास द्वारका सर्कल आणखी मोकळा श्वास घेणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTempleमंदिर