आश्वासनानंतर पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:14 IST2021-05-12T04:14:41+5:302021-05-12T04:14:41+5:30

सिन्नर : तोकड्या पगारावर काम करावे लागणाऱ्या सिन्नर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी पगारवाढीसाठी कामबंद आंदोलन पुकारले होते. ...

After the assurance, the water supply workers went on strike | आश्वासनानंतर पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन मागे

आश्वासनानंतर पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन मागे

सिन्नर : तोकड्या पगारावर काम करावे लागणाऱ्या सिन्नर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी पगारवाढीसाठी कामबंद आंदोलन पुकारले होते. दरम्यान, नगराध्यक्ष किरण डगळे यांनी मध्यस्थी केल्यानंतर संबंधित ठेकेदाराने मे महिन्यात दीड हजार रुपये वेतनवाढ देण्याचे मान्य केल्याने कामगारांनी दुपारी ३ वाजेदरम्यान काम बंद आंदोलन मागे घेतले.

नगरपालिकेत पाणीपुरवठा विभागात गुळवंच येथील पी. व्ही. लेबर्स सप्लायरच्या नावे असलेला कर्मचारी पुरवण्याचा ठेका सत्ताधारी गटाशी संबंधित तीन ते चार उपठेकेदार चालवत आहेत. त्याअंतर्गत ४० ते ४५ कर्मचारी काम करत असून, त्यापोटी दरमहा सात ते सव्वासात लाख रुपये बिल नगरपालिका संबंधित ठेकेदारास अदा करत असल्याचे पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्या बदल्यात ठेकेदाराकडून पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना दरमहा साडेसात ते साडेदहा हजार रुपयांपर्यंत वेतन अदा केले जात आहे. वेतनाची ही रक्कम तोकडी असून, कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी ३० कर्मचाऱ्यांनी एकत्र येत नगरपालिकेच्या पायर्‍यांवर ठिय्या मारत सकाळपासून काम बंद आंदोलन पुकारले होते. नगराध्यक्ष किरण डगळे यांनी मध्यस्थी करत कामगारांचे प्रतिनिधी राकेश शिंदे, स्वप्नील पाटील, राकेश देसले, ऋषिकेश सहाणे, ज्ञानेश्‍वर उगले, सागर गुजराथी आदींना चर्चेसाठी बोलावून घेत संबंधित उपठेकेदारांशी चर्चा घडवून आणली.

----------------

सिन्नर येथे वेतनवाढीसाठी नगरपालिकेच्या पायऱ्यांवर काम बंद आंदोलनात सहभागी झालेले पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी. (११ सिन्नर ६)

===Photopath===

110521\11nsk_12_11052021_13.jpg

===Caption===

११ सिन्नर ६

Web Title: After the assurance, the water supply workers went on strike