दोन उमेदवारांचे अर्ज बाद
By Admin | Updated: January 19, 2017 01:06 IST2017-01-19T01:05:52+5:302017-01-19T01:06:18+5:30
पदवीधर निवडणूक : रिंगणात २२ उमेदवार; शुक्रवारी माघार

दोन उमेदवारांचे अर्ज बाद
नाशिक : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जांची बुधवारी छाननी करण्यात येऊन त्यात दोघांचे अर्ज बाद करण्यात आल्याने या निवडणुकीच्या रिंगणात २२ उमेदवार उतरले आहेत. शुक्रवारी (दि. २०) माघार घेण्याची अंतिम मुदत असल्याने त्यानंतरच खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होईल. पदवीधर निवडणुकीसाठी मंगळवारी नामांकन दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत २४ उमेदवारांनी ३९ अर्ज दाखल केले होते. बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. एकनाथ डवले यांच्या उपस्थितीत अर्जांची छाननी करण्यात आली. त्यात विजय गायकवाड व अशोक पाटील या दोघांच्या अर्जासोबत पुरेशी कागदपत्रे जोडलेली नसल्याचे लक्षात आल्याने त्यांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. गायकवाड यांनी एक, तर पाटील यांनी चार अर्ज सादर केले होते. निवडणूक रिंगणात प्रमुख उमेदवारांव्यतिरिक्त मनोज दामोदर पवार, आशिष युवराज बागुल, संतोष कौतिक इंगळे, महेश भाऊसाहेब कडूस, विठ्ठलराव नेमूजी गुंजाळ, विवेक देवीदास ठाकरे, मंगेश मनोहर ढगे, नितीन नारायण सरोदे, सचिन शिवाजीराव पठारे, बाळासाहेब बाजीराव पवार, बापू पाराजी रणधीर, पुरुषोत्तम कारभारी रकिबे, बाळासाहेब धोंडिबा लांडे, शरद मंगा तायडे, शंकर गोविंद सोमवंशी, सुभाष भाऊसाहेब डांगे, संजय भीमराव सूर्यवंशी, सुरेश ताके, संजय गांधी हे उतरले आहेत. (प्रतिनिधी)