शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर खान्देश मिलच्या कामगारांना मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:17 IST

३३ वर्षांपूर्वी बंद पडून दिवाळखोरीत निघालेल्या जळगाव येथील खान्देश मिलमधील काही कामगारांना त्यांच्या कामगार असल्याच्या पुराव्याअभावी कायदेशीर देणी मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. कामगार आयुक्त कार्यालयाने त्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यांना न्याय मिळवून दिला. विशेषत: सहायक कामगार आयुक्त रविराज इळवे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.

गोकुळ सोनवणे ।सातपूर : ३३ वर्षांपूर्वी बंद पडून दिवाळखोरीत निघालेल्या जळगाव येथील खान्देश मिलमधील काही कामगारांना त्यांच्या कामगार असल्याच्या पुराव्याअभावी कायदेशीर देणी मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. कामगार आयुक्त कार्यालयाने त्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यांना न्याय मिळवून दिला. विशेषत: सहायक कामगार आयुक्त रविराज इळवे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.  जळगाव येथील सर्वांत मोठा उद्योग समजला जाणाºया खान्देश मिलमध्ये अडीच हजारपेक्षा अधिक कामगार काम करीत होते. ३३ वर्षांपूर्वी अचानक हा उद्योग बंद पडला. दिवाळखोरीत निघालेल्या या उद्योगावर अवसायकाची नेमणूक करण्यात आली होती. मिलमधील कामगारांनी देणी मिळावी म्हणून कामगारांचे नेतृत्व करणाºया राष्ट्रीय गिरणी कामगार संघाने कामगार आयुक्त, कामगार न्यायालयात धाव घेतली होती. हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला होता. प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर तब्बल ३१ वर्षांनंतर म्हणजेच मे २०१६ पासून न्यायालयाच्या आदेशानुसार कामगारांना त्यांची ग्रॅच्युईटी आणि इतर कायदेशीर देणी मिळण्यास सुरु वात झाली.  अवसायकांनी मंजूर केलेली दावा रक्कम मिळण्यासाठी नाशिक विभागाचे सहायक कामगार आयुक्त रविराज इळवे यांचेकडे जवळपास दोन हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १७५० दावे (अर्ज) निकाली काढून संबंधित कामगार अथवा त्यांच्या वारसांना पाच कोटी रु पयांच्या वर देणी वाटप करण्यात आली आहेत. १७५० कामगारांना त्यांची देणी मिळालीत. परंतु उर्वरित सुमारे साडेचारशे कामगार मयत आणि दोनशे कामगारांकडे ते कामगार असल्याचा पुरावा नसल्याने त्यांना देणी मिळण्यासाठी अडचणी येत होत्या. अशा कामगारांनी सहायक कामगार आयुक्त रविराज इळवे यांचेकडे कैफियत मांडली.  पुराव्याअभावी कामगारांची रखडलेली देणी मिळवून देण्यासाठी सहायक कामगार आयुक्त इळवे यांनी जळगाव येथील राज्य कामगार विमा रु ग्णालयाशी सम्पर्कसाधून सदर कामगारांचे काही पुरावे मिळतात का याची पडताळणी केली.  इळवे यांनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी रु ग्णालयात मदतीला पाठवून ३३ वर्षांपूर्वीचे रेकॉर्डची तपासणी केली. त्या तपासणीत ११७ कामगारांचे पुरावे मिळालेत. ते पुरावे न्यायालयात सादर करून त्यांना त्यांची कायदेशीर देणी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. यात कामगार संघटनेचे सरचिटणीस असलेले एस. आर. पाटील यांचाही दावा पुराव्याअभावी प्रलंबित होता. त्यांनाही पुरावा मिळवून दिला.शासकीय कार्यालये आणि संबंधित अधिकारी यांच्या विषयी लोकांची खूप चांगली भावना नसते. परंतु खान्देश मिल कामगारांना वेगळा अनुभव आला आहे. जळगाव येथील ईएसआयसी रु ग्णालय आणि नाशिक कामगार उपायुक्त कार्यालय या दोन शासकीय कार्यालयातील समन्वयामुळे कामगारांना ३३ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कायदेशीर देणी मिळवून देण्यात यश मिळाले आहे.  - रविराज इळवे, सहायक कामगार आयुक्त, नाशिक.