After all swine flu control is under control | अखेर स्वाइन फ्लू आला नियंत्रणात
अखेर स्वाइन फ्लू आला नियंत्रणात

नाशिक : गेल्या चार महिन्यांत आठ बळी घेणाऱ्या स्वाइन फ्लूची अखेर तीव्रता कमी झाली असून, यंदा वीस दिवसांत नऊ ते दहा रुग्णच आढळले आहेत. तसेच कोणाचाही बळी न गेल्याने महापालिकेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
गेल्यावर्षी स्वाइन फ्लूचा उपद्रव वाढला नव्हता. चार ते पाच महिन्यांत केवळच एकालाच स्वाइन फ्लू झाला होता आणि त्यात त्या रुग्णाचाच मृत्यू झाल होता. मात्र यंदा जानेवारी महिन्यापासून रुग्ण संख्या वाढतच गेली. जानेवारीत सात तर फेब्रुवारीत ४२, मार्च महिन्यात ४९ याप्रमाणे रुग्ण आढळले होते. तर एप्रिल महिन्यापर्यंत एकूण आठ जणांचा बळी गेला
होता. दरम्यान, चालू मे महिन्यात तीव्रता कमी झाली असून, वीस महिन्यांत जेमतेम दहा रुग्ण आढळले आहेत. तसेच सुदैवाने कोणाचाही मृत्यू झालेला नाही, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.


Web Title:  After all swine flu control is under control
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.