शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

अखेर ग्रीन फिल्डची भिंत बांधण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:41 IST

गंगापूररोडवरील ग्रीन फिल्ड लॉन्सची अतिक्रमित भिंत बांधण्यास महापालिकेने प्रारंभ केला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाडकाम दुरुस्त केले जाणार असले तरी त्यासाठी न्यायमूर्तींनी दिलेली सहा आठवड्याची मुदत संपुष्टात आल्याने त्यावर आता न्यायालय काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.

नाशिक : गंगापूररोडवरील ग्रीन फिल्ड लॉन्सची अतिक्रमित भिंत बांधण्यास महापालिकेने प्रारंभ केला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाडकाम दुरुस्त केले जाणार असले तरी त्यासाठी न्यायमूर्तींनी दिलेली सहा आठवड्याची मुदत संपुष्टात आल्याने त्यावर आता न्यायालय काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे. गोदावरी प्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकेची सुनावणी करताना नदीच्या पूररेषेतील बेकायदेशीर बांधकामे तातडीने हटविण्याचे आदेश दिले होते. सदरची कार्यवाही नीरी या संस्थेच्या अहवालानंतर करण्यास महापालिकेला बजावले होते.  यावर यापूर्वी कार्यवाही झाली नसली तरी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात कार्यवाहीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार कार्यवाही सुरू केली. माजी महापौर प्रकाश मते यांच्या मालकीच्या ग्रीन फिल्ड या लॉन्सच्या बांधकामावर हातोडा चालविला होता.  दरम्यान, महापालिकेने आगाऊ दिलेल्या नोटिसीमुळे मते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली व त्यानुसार न्यायालयाने महापालिकेला या लॉन्सचे बांधकाम हटवू नये असे आदेश मे महिन्यात दिले होते. मात्र, तरीही महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष करून या लॉन्सची भिंत पाडल्याने त्याविरुद्ध लॉन्सचालकांनी पुन्हा न्यायालयात धाव घेऊन न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळेच महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना माफीनामा सादर करावा लागला होता.उच्च न्यायालयाने सहा आठवड्यांत पाडलेली भिंत पुन्हा बांधून देण्याचे आदेश दिले होते.  त्यानुसार महापालिकेने कार्यवाही सुरू केली. १९ लाख रुपयांच्या कामाच्या निविदा मागविल्या, प्रत्यक्षात १७ लाख रुपयांत काम होत असून, कार्यारंभ आदेश दिल्यानंतर आठ दिवसांपूर्वी कामकाज सुरू झाले आहे.  तथापि, न्यायालयाने दिलेली मुदत टळूनही पूर्ण बांधकाम झाले नसल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका