मृत्यू प्रमाणपत्रांसाठी मयतांच्या नातेवाइकांची परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:24 IST2021-05-05T04:24:22+5:302021-05-05T04:24:22+5:30
चौकट=== मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष मनपाच्या जन्म-मृत्यू विभागात दाखला देण्यासाठी कोरा कागद प्रशासनाकडून उपलब्ध करून दिला जात नसल्याने अधिकारी-कर्मचारी स्वतःचे ...

मृत्यू प्रमाणपत्रांसाठी मयतांच्या नातेवाइकांची परवड
चौकट===
मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष
मनपाच्या जन्म-मृत्यू विभागात दाखला देण्यासाठी कोरा कागद प्रशासनाकडून उपलब्ध करून दिला जात नसल्याने अधिकारी-कर्मचारी स्वतःचे पैसे खर्च करून कागद आणत आहेत. मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठीचे विहित नमुन्यातील अर्जदेखील शिल्लक नसल्याने संबंधित कर्मचारी मृत्यू प्रमाणपत्र घेण्यास येणाऱ्या नातेवाइकांनाच अर्जाची झेरॉक्स करून आणायला सांगतात. मनपाचा छपाई विभाग बंद असल्याने ही सर्व गैरसोय होत आहे. मुळात शहरातील सर्व झेरॉक्स दुकाने बंद असल्याने संबंधित नातेवाईकाला वणवण भटकावे लागत आहे.
चौकट===
नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालयातील झेरॉक्स मशीन नादुरुस्त होऊन बंद पडल्याने दोन नंबरच्या कार्यालयात कपाटावर ते धूळ खात पडून आहे. मनपा विभागीय कार्यालय झेरॉक्स मशीन उपलब्ध असते तर अधिकारी कर्मचारी व मृतांच्या नातेवाइकांनादेखील वणवण भटकावे लागले नसते.
(फोटो ०४ रोड) नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालयातील जन्म-मृत्यू विभागात टेबलावर साचलेले मृत्यू प्रमाणपत्राचे कागदपत्रे.