येवला पंचायत समितीच्या उपसभापतीपदी अॅड. मंगेश भगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 16:37 IST2020-08-29T16:35:53+5:302020-08-29T16:37:02+5:30
येवला : येवला पंचायत समिती उपसभापतीपदी शिवसेनेचे अॅड. मंगेश भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समिती उपसभापती लक्ष्मीबाई गरूड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली.

येवला पंचायत समितीचे नवनिर्वाचित उपसभापती अॅड. मंगेश भगत यांचा सत्कार करतांना शिवसेना नेते संभाजी पवार. समवेत शिक्षक आमदार किशोर दराडे, अॅॅड. माणिकराव शिंदे, सभापती प्रविण गायकवाड आणि पंचायत समिती सदस्य.
येवला : येवला पंचायत समिती उपसभापतीपदी शिवसेनेचे अॅड. मंगेश भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समिती उपसभापती लक्ष्मीबाई गरूड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली. विशेष सभेत शिवसेनेच्या वतीने अॅॅड. मंगेश भगत यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी घोषीत केले. सभेस सभापती प्रवीण गायकवाड, पंचायत समिती सदस्य आशा साळवे, लक्ष्मीबाई गरुड, नम्रता जगताप, अनिता काळे, मोहन शेलार, सुनीताबाई मेंगाने, कविता आठशेरे, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख आदी उपस्थित होते.
सभागृहात नवनिर्वाचित उपसभापती अ?ॅड. मंगेश भगत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिक्षक आमदार किशोर दराडे, अड. माणिकराव शिंदे यांची भाषणे झाली. या प्रसंगी माजी सभापती संभाजी पवार, रतन बोरणारे, भास्कर कोंढरे, देवचंद गायकवाड, भास्कर येवले, नवनाथ काळे, अरुण काळे, शरद लहरे, कांतीलाल साळवे, सुनील पैठणकर, अशोक मेंगाने, बी. एन. सोनवणे, चंद्रकांत शिंदे, बापू गायकवाड आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन चंद्रकांत शिंदे यांनी केले. आभार प्रदर्शन मोहन शेलार यांनी केले.