शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

..अन् तृतीयपंथीयांनी केली मनोभावे वडपूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 01:35 IST

नाशिक : पूजेच्या साहित्याने सजलेले ताट, मध्यभागी वडाच्या झाडाची कुंडी, मंद तेवणारी समई, झेंडूच्या फुलांचा हार व तोरण, उदबत्तीचा दरवळ अशा मंगलमय वातावरणात उत्साहाला उधाण आले होते. तुम्ही म्हणाल वटपौर्णिमा असल्याने हे चित्र तर सर्वत्र दिसणे स्वाभाविकच आहे पण ही सारी सिद्धता कुठल्याही वडपुजेच्या ठिकाणी नव्हती तर तृतीयपंथियांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या कार्यालयात दिसून आली.

ठळक मुद्देमनमीलन संस्थेचा उपक्रम तृतीयपंथीयांची संस्था असलेल्या ‘मनमीलन संस्थे’तर्फे वटपौर्णिमा साजरी

नाशिक : पूजेच्या साहित्याने सजलेले ताट, मध्यभागी वडाच्या झाडाची कुंडी, मंद तेवणारी समई, झेंडूच्या फुलांचा हार व तोरण, उदबत्तीचा दरवळ अशा मंगलमय वातावरणात उत्साहाला उधाण आले होते. तुम्ही म्हणाल वटपौर्णिमा असल्याने हे चित्र तर सर्वत्र दिसणे स्वाभाविकच आहे पण ही सारी सिद्धता कुठल्याही वडपुजेच्या ठिकाणी नव्हती तर तृतीयपंथियांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या कार्यालयात दिसून आली.आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे, त्याचे आरोग्य चांगले राहावे यासाठी सुहासिनी वटपौर्णिमेला वडाची मनोभावे पूजा करतात. यानिमित्ताने नटूनथटून, दागदागिने, चांगल्या साड्या घालून निसर्गाच्या सान्निध्यात वेळ व्यतीत करतात, अशी संधी आपण का घेऊ नये हा विचार करून शहरातील तृतीयपंथीयांची संस्था असलेल्या ‘मनमीलन संस्थे’तर्फे वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. संस्थेच्या गंजमाळ येथील कार्यालयात वडाचे झाड आणून जवळपास ३० तृतीयपंथीय व काही समलैंगिक पुरुष यांनी एकत्र जमत वडाचे यथासांग पूजन केले. संस्थेतर्फे दरमहा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम घेतला जातो. त्यात यावर्षीपासून वटपौर्णिमा साजरी करण्याचा विचार मनात आल्याने व त्यावर बहुमत झाल्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यासाठी बाजारातून पूजेचे सर्व साहित्य आणण्यात आले होते.वडाच्या झाडाला सर्व पूजा अर्पण करून मनोभावे दोरे बांधून, आरती करून पूजा करण्यात आली. रांगोळी, समई, हार, फुले, उदबत्ती, फळे अशी सारी सज्जता करण्यात आली होती. पूजेनंतर एक वेगळा आनंद लाभल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.केवळ समाधानासाठीतृतीयपंथीय लोक आपल्यात एक स्त्री लपलेली असते असे मानतात. त्यामुळे इतर स्त्रियांप्रमाणे आपणही साजशृंगार करून पूजा करावी, धार्मिक कार्यक्रमाद्वारे हे आगळेवेगळे समाधान मिळवावे असा विचार त्यांच्या मनात आला. त्यानुसार हा कार्यक्रम पार पडला. पूजेनंतर सर्वांच्या चेहेºयावर एक वेगळेच समाधान दिसले.- राजेंद्र गमे, प्रकल्प समन्वयक, मनमीलन संस्था