शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

येवल्यात मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 6:11 PM

येवला : तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी, (दि. १८) मतमोजणी होत असून, प्रशासकीय पातळीवर मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, येवला तालुक्यातील राजकारणात महत्त्वाच्या ठरणार्‍या नगरसूल, मुखेड, पाटोदा, अंदरसूल या प्रमुख ग्रामपंचायतींसह राजापूर, अंगणगाव, बोकटे या चर्चित ग्रामपंचायत निकालांकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

ठळक मुद्दे१००९ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार; निकालाबाबत उत्सुकता

येवला : तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी, (दि. १८) मतमोजणी होत असून, प्रशासकीय पातळीवर मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, येवला तालुक्यातील राजकारणात महत्त्वाच्या ठरणार्‍या नगरसूल, मुखेड, पाटोदा, अंदरसूल या प्रमुख ग्रामपंचायतींसह राजापूर, अंगणगाव, बोकटे या चर्चित ग्रामपंचायत निकालांकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.सकाळी १० वाजता तहसील कार्यालयात मतमोजणीस सुरुवात होणार आहे. दहा टेबलवर एकाचवेळी मतमोजणी प्रक्रिया चालणार असून, मतमोजणीसठी ४० निवडणूक निर्णय अधिकारी, १० मतमोजणी पर्यवेक्षक, १० सहायक, २० मदतनीस कर्मचारी असणार आहेत.मतमोजणीच्या सात फेर्‍या होणार आहेत. पहिल्या फेरीत सातारे, मुखेड, सोमठाणदेश, धामणगाव, अंगणगाव, डोंगरगाव, कोटमगाव खुर्द, निमगाव मढ, अंदरसूल, देशमाने, दुसर्‍या फेरीत जळगाव नेऊर, नगरसूल, आंबेगाव, सायगाव, आहेरवाडी (लहित, जायदरे, हडप सावरगाव), खामगाव, नागडे, उंदिरवाडी, अनकुटे (सावखेडे), धामोडे, तिसर्‍या फेरीत मुरमी, खरवंडी, विसापूर, पन्हाळसाठे (पिंपळखुटे ३रे) , अनकाई, ठाणगाव, राजापूर, पिंपळखुटे बुद्रूक, तळवाडे (कौटखेडे), बाभुळगाव खुर्द, चौथ्या फेरीत पाटोदा, देवठाण, नांदुर, खिर्डीसाठे, गुजरखेडे, साताळी, ममदापूर, बोकटे, अंगुलगाव, महालखेडा (पाटोदा), पाचव्या फेरीत भाटगाव, नेऊरगाव, गणेशपुर, रेंडाळे (न्याहारखेडे बुद्रूक, खुर्द), खैरगव्हाण, धुळगाव, भारम, देवळाणे, वाघाळे, वडगाव बल्हे, सहाव्या फेरीत पिंपळगाव लेप, पुरणगाव, आडगाव रेपाळ, कोळगाव (वाईबोथी), विखरणी, एरंडगाव बुद्रूक, रहाडी, भुलेगाव, सत्यगाव, मातुलठाण, तर सातव्या फेरीत कोळम बुद्रूक ग्रामपंचायतीची मतमोजणी होणार आहे.पहिल्या पंधरा मिनिटांत पहिला निकाल हाती येईल, तर दुपारी १ वाजेपर्यंत संपूर्ण मतमोजणी पूर्ण होणार असल्याची माहिती तहसीलदार तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले यांनी दिली. येवला तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यात ८ ग्रामपंचायतींसह १८९ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींसाठी ८४.३४ टक्के मतदान झाले. ४३ हजार ६३३ महिला व ५० हजार ९९२ पुरुष असे एकूण ९४ हजार ६२५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

६१ ग्रामपंचायतींच्या १८५ प्रभागाच्या ४६४ जागांसाठी १००९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकPoliticsराजकारण