शासनाची प्रशासकीय मान्यता : लवकरच कामाला प्रारंभ होणार

By Admin | Updated: April 29, 2015 23:55 IST2015-04-29T23:55:22+5:302015-04-29T23:55:41+5:30

कळवण, सुरगाण्यात सांस्कृतिक भवन

Administrative approval: Government will soon start work | शासनाची प्रशासकीय मान्यता : लवकरच कामाला प्रारंभ होणार

शासनाची प्रशासकीय मान्यता : लवकरच कामाला प्रारंभ होणार

कळवण : राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून कळवण व सुरगाणा या दोन आदिवासी तालुक्यासाठी स्वतंत्र सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी प्रत्येकी एक कोटी रु पयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून सदर सास्कृतिक भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रशासकीयस्तरावरील कार्यवाही ,अंदाजपत्रक ,तांत्रिक व निविदा प्रक्रि या पूर्ण करून निधी उपलब्ध मागणी शासनस्तरावर करून लवकरच कामास प्रारंभ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली
ए टी पवार यांनी केलेल्या मागणीची दखल घेवून दिंडोरी येथील एका कार्यक्र मात पिचड यांनी घोषणा केली होती ,सदर कामासाठी मागील वर्षी प्रत्येकी ?? लाखाचा निधी देखील मंजूर केला होता,भाजप शिवसेनेच्या महायुती सरकारच्या आदिवासी विभागाने कळवण , सुरगाणा तालुक्यासाठी स्वतंत्र आदिवासी सास्कृतिक भवन बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली असल्याने आदिवासी बांधवांचे सास्कृतिक भवनाचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर आहे
कळवण व सुरगाणा या दोन आदिवासी तालुक्यात स्वतंत्र सांस्कृतिक भवन बांधावे अशी मागणी पवार यांनी केली होती आदिवासी बंधावामध्ये अनेक कला गुण आहेत त्यांना वाव मिळावा ,आदिवासी भागात सामुदायिक विवाह सोहळा हि संकल्पना दृढ झाली असल्याने त्यासाठी हक्काचे व्यासपीठ असावे ,विविध कार्यक्र म ,उपक्र म ,समारंभसाठी सांस्कृतिक भवन बांधावे अशी माजी मंत्री पवार यांची संकल्पना होती, यासाठी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा सुरु होता आता प्रत्यक्षात शासनस्तरावरून आदिवासी विभागाकडून सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या असून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे
राज्यात आदिवासी भागात आदिवासी संस्कृती लोप पावत चालली आहे आदिवासी बांधवांच्या कला गुणांना वाव मिळावा हा आदिवासी विकास विभागाचा आण िशासनाचा मुख्य उद्देश असून आदिवासी बांधवांच्या सास्कृतिक कार्यक्र माना हक्काचे व्यासपीठ मिळावेकला गुणांना वाव मिळावा यासाठीच आदिवासी सास्कृतिक भवनाची संकल्पना पुढे आली असून कळवण प्रकल्पातील सास्कृतिक भवन बांधकामासाठी चालना देणार असल्याची माहिती प्रकल्पधिकारी अविनाश चव्हाण यांनी दिली.

Web Title: Administrative approval: Government will soon start work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.