प्रशासनाकडून विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी सूरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 17:45 IST2019-06-21T17:44:57+5:302019-06-21T17:45:08+5:30

सिन्नर : आगामी विधानसभेची निवडणूक चार महिन्यांवर येवून ठेपली असून त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची पूर्व पयारी सुरू केली आहे.

The administration prepares for the assembly elections | प्रशासनाकडून विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी सूरू

प्रशासनाकडून विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी सूरू

सिन्नर : आगामी विधानसभेची निवडणूक चार महिन्यांवर येवून ठेपली असून त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची पूर्व पयारी सुरू केली आहे. उपजिल्हा निवडणुक अधिकारी अरूण आनंदकर यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघास भेट देवून आढावा घेत साहित्याचे वाटप केले.
लोकसभेचा धुराळा खाली बसतो न बसतो तोच राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरू झाली आहे. राज्यात दिवळीपूर्वी निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. ते बघता जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची पूर्व तयारी सुरू केली आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी आनंदकर यांनी सिन्नर विधानसभा मतदार संघाला भेट देवून तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी तहसीलदार राहुल कोताडे व निवडणुक नायब तहसीलदार यांच्याशी चर्चा करून तयारीचा पूर्व आढावा घेतला. तसेच मदतार, यादी, साहित्यवाटप स्वीकृती, स्ट्रॉँगरूम व मतमोजणी याचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात शहरात चार व इतर अकरा असे एकुण १५ मतदारसंघ आहेत.

Web Title: The administration prepares for the assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.