शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
2
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
3
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
4
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
5
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
6
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
7
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
8
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
9
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
10
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
11
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
12
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
13
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
14
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
15
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
16
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
17
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
18
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
19
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
20
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...

प्रचारातील सोशल मीडियाच्या खर्चावरही प्रशासनाची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 02:04 IST

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, मेसेज यांसह सर्व प्रकारच्या समाजमाध्यमांवर केल्या जाणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारातील खर्चावरही यंदाच्या निवडणुकीपासून प्रशासन करडी नजर ठेवणार आहे. त्यासाठी या माध्यमांवरील देखरेखीसाठी स्वतंत्र पथक तर खर्चाच्या दरांचा स्वतंत्र तक्तादेखील बनविण्यात येणार आहे. यंदा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देयंत्रणा सज्ज । मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी उपाययोजना

नाशिक : व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, मेसेज यांसह सर्व प्रकारच्या समाजमाध्यमांवर केल्या जाणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारातील खर्चावरही यंदाच्या निवडणुकीपासून प्रशासन करडी नजर ठेवणार आहे. त्यासाठी या माध्यमांवरील देखरेखीसाठी स्वतंत्र पथक तर खर्चाच्या दरांचा स्वतंत्र तक्तादेखील बनविण्यात येणार आहे. यंदा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.लोकसभेची निवडणूक ४७२० मतदान केंद्रांवर घेण्यात आली होती. यावेळच्या विधानसभा निवडणुकीसाठी ४५७९ मतदान केंद्रं सज्ज करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभांच्या निवडणुकीची तयारी व आदर्श आचारसंहितेबाबतची माहिती दिली. यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी, पोलीस उपअधीक्षिक शर्मिष्ठा वालावलकर, अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कुंदन सोनवणे आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारी पैशातून मतदारांवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सोशल माध्यमांवरील प्रचार उमेदवारांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात येणार आहे. त्याचे दर ठरविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाभरातील निवडणुकांसाठी लोकसभा निवडणुकांमध्ये वापरण्यात आलेला ३० हजार कर्मचाºयांचा प्रशिक्षित स्टाफच वापरला जाणार आहे.२४ सप्टेंबरपर्यंत नाव बदल शक्यअजूनदेखील काही उमेदवार किंवा नागरिकांनी मतदार यादीतील नावात दोष असल्यास २४ सप्टेंबरपर्यंत नावात बदल करणे शक्य असल्याची त्यांनी नोंद घ्यावी. मात्र, ज्या मतदारांची नावे १ जानेवारी २०१९ च्या पूर्वी नोंदवली गेली आहेत, त्यांनाच मतदान करण्याचा अधिकार राहणार असल्याचेही मांढरे यांनी सांगितले. तसेच ज्या मतदारांना काही माहिती मिळवायची किंवा तक्रार करायची असल्यास त्यांनी १९५० या क्रमांकावर संपर्क साधावा. इंटरनेटवर सी व्हिजील किंवा सुविधा साइटवरदेखील नागरिकांना सर्व माहिती उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकाºयांनी नमूद केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय