शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

उपकार्यालयाचा कारभार  अद्याप समाजमंदिरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:44 IST

मनपाच्या उपकार्यालयाची कागदपत्रे, संगणक व खुर्ची-टेबल सत्यम सोसायटीतील मनपाच्या समाजमंदिरात हलविण्यात आले; परंतु तेथे काम करणाऱ्या कर्मचाºयांना बसण्यास जागाच न राहिल्याने त्यांना घरपट्टी, पाणीपट्टी व अन्य कामांसाठी जागाच उरली नाही

इंदिरानगर : मनपाच्या उपकार्यालयाची कागदपत्रे, संगणक व खुर्ची-टेबल सत्यम सोसायटीतील मनपाच्या समाजमंदिरात हलविण्यात आले; परंतु तेथे काम करणाऱ्या कर्मचाºयांना बसण्यास जागाच न राहिल्याने त्यांना घरपट्टी, पाणीपट्टी व अन्य कामांसाठी जागाच उरली नाही. त्यामुळे कर्मचारी लोकसुविधा केंद्रात उभे राहून किंवा नागरिकांसाठी बसण्यासाठी असलेल्या जागेवर बसून काम करताना दिसून येत आहे. येथील महापालिकेच्या उपकार्यालयाची लाखो रुपयांचा महसूल देऊनही स्वमालकीच्या जागेअभावी अद्यापही फरपट सुरू आहे.  इंदिरानगर परिसरातील मिळकतधारकांच्या मागणीनुसार सुमारे पंधरा वर्षांपूर्वी कमोदनगर येथील मनपाच्या हजेरी शेडमध्ये उपकार्यालय सुरू करण्यात आले होते. सदर पत्र्याच्या शेडमध्ये उपकार्यालय सुरू करण्यात आल्याने त्या ठिकाणी काम करणारे सुमारे तेरा कर्मचारी उन्हाळ्यात उन्हाच्या तडाख्यामुळे आणि पावसाळ्यात पावसाचे पाणी आत शिरत असल्याने कर्मचाºयांना बसणेसुद्धा मुश्कील झाले होते. तसेच तेथे येणाºया नागरिकांना त्रास होत असे. उन्हाळ्यात तर उन्हाच्या तडाख्यामुळे अधिकारी व कर्मचारी झाडांचा आश्रय घेऊन काम करीत असे, अशा बिकट परिस्थितीत सुमारे सहा ते सात वर्षे पत्र्याच्या शेडमध्ये कार्यालय होते. नागरिक आणि अधिकाºयांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन अखेर शंभर फुटी रस्त्यालगत असलेल्या लोकसुविधा केंद्रात सुमारे सात वर्षांपूर्वी उपकार्यालय सुरू करण्यात आले; परंतु लोकसुविधा केंद्राची जागा अपुरी असल्याने अधिकाºयांना खुर्ची ठेवल्यावर आलटून-पालटून बसावे लागत होते. तेथेही पत्र्याचे छत असल्याने उन्हाळ्याच्या तडाख्यापासून कर्मचारी आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.सुमारे दहा महिन्यांपूर्वीच लोकसुविधा केंद्र सुरू करण्यात आल्याने उपकार्यालय तेथून हटविण्यात आले. त्याठिकाणी घरपट्टी व पाणीपट्टी स्वीकारणे आणि आधार कार्ड केंद्र सुरू करण्यात आले, त्यामुळे मनपाच्या उपकार्यालयची कागदपत्रे, संगणक व खुर्ची-टेबल सत्यम सोसायटीतील मनपाच्या समाजमंदिरात हलविण्यात आले; परंतु तेथे काम करणाºया कर्मचाºयांना बसण्यास जागाच न राहिल्याने त्यांना घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कामांसाठी जागाच उरली नाही.कर्मचारी लोक सुविधा केंद्रात उभे राहून किंवा नागरिकांसाठी बसण्यासाठी असलेल्या जागेवर बसून काम करताना दिसून येत आहे. परिसरातील हजारोंच्या संख्येने राहणारे मिळकतदार पाणीपट्टी व घरपट्टी याच उपकार्यालयात भरत असल्याने त्यामुळे महापालिकेला लाखो रु पयांचा महसूल मिळतो; परंतु गेल्या पंधरा वर्षांपासून महापालिकेच्या स्वमालकीच्या जागेत उपकार्यालय सुरू करण्याची मागणी धूळ खात पडून आहे. त्यामुळे कर्मचारी आणि नागरिकांची होणारी गैरसोय केव्हा थांबेल, असा प्रश्न त्रस्त नागरिकांनी केला आहे.बिले काढण्यासाठी एकच संगणकया उपकार्यालयाकडून पाणी आणि घरपट्टीद्वारे लाखो रु पयांचा महसूल मिळतो तरी अद्यापही स्वमालकीच्या जागेत उपकार्यालय का होत नाही, मनपाचे अनेक भूखंड पडून असूनही त्याचा उपयोग का केला जात नाही, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. सुमारे बारा हजार घरपट्टी मिळकतधारक व सुमारे पाच हजार पाणीपट्टीधारक असून, या सर्वांची बिले काढण्यासाठी एकच संगणक आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका