इगतपुरी : कातकरी-आदिवासींच्या विविध मागण्यासाठी हजारोंच्या संखेने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या घरावर 8 आॅगस्टला बिर्हाड मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा अखिल भारतीय आदिवासी सेनेचे अध्यक्ष दि.ना.उघाडे यांनी केली.ते कावनई येथील आदिवासी जनजागृती मेळाव्या दरम्यान बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संपर्क प्रमुख मिलिन जाधव,जिल्हा कार्यकारणी अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघ,नामदेव भडांगे,तालुका संपर्क प्रमुख गोकुळ हिलम,संघटक कैलास हिलम,किसन पाडेकर उपस्थित होते.कातकरी-आदिवासी बांधवांनी पारंपारिक पद्धतीने कामडनाच करून मान्यवरांचे स्वागत केले.विविध मागण्यांचे निवेदन देत मुंबई मोर्चात सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संखेने उपस्थित राहणार असल्याचे तालुका कार्यकारनीच्या वतीने सांगण्यात घोषित करण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष एकनाथ मुकणे,बाळू वाघ,मिच्छंद्र वाघ,बबन हंबीर,अर्जुन शिद,पंढरी मुकणे,विश्वनाथ क-र्हे,जयाबाई वाघ,सुगंदाबाई हिलम,संगीता शिद,मोतीराम पवार,वाल्मिक हिलम,सुनील वाघ आदि कार्यकर्ते यांसह शेकडोंच्या संखेने कातकरी-आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.
आदिवासी सेनेचा जनजागृती मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 21:10 IST
इगतपुरी : कातकरी-आदिवासींच्या विविध मागण्यासाठी हजारोंच्या संखेने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या घरावर 8 आॅगस्टला बिर्हाड मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा अखिल भारतीय आदिवासी सेनेचे अध्यक्ष दि.ना.उघाडे यांनी केली.
आदिवासी सेनेचा जनजागृती मेळावा
ठळक मुद्दे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या घरावर 8 आॅगस्टला बिर्हाड मोर्चा