अपर जिल्हाधिकारी पवार यांना जामीन

By Admin | Updated: August 9, 2015 23:53 IST2015-08-09T23:51:35+5:302015-08-09T23:53:02+5:30

अपर जिल्हाधिकारी पवार यांना जामीन

Additional District Collector Pawar to bail out | अपर जिल्हाधिकारी पवार यांना जामीन

अपर जिल्हाधिकारी पवार यांना जामीन

नाशिक : नवीन शर्तीच्या जमीन व्यवहारात तरतुदींचा भंग केल्यामुळे जमीनमालकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची नोटीस दिल्यानंतर गुन्हा दाखल न करण्यासाठी ३५ लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेले मालेगावचे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार व खासगी व्यक्ती दिनेशभाई पंचासरा यांना रविवारी (दि़९) न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला़
अपर जिल्हाधिकारी पवार व पंचासरा यांना शुक्रवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत पवार यांच्याकडे ५८़५ तोळे सोने, विंचूर दळवी येथे १३ एकर शेतजमीन, श्रीगोंदा येथील दोन हजार स्क्वेअर फूटचा बंगला, कृषिनगरमध्ये फ्लॅट, रामेश्वनगरमधील चार गुंठे जागेवर सुरू असलेले बंगल्याचे बांधकाम सुरू असल्याचे समोर आले आहे़
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पवार व पंचसरा यांची दोन दिवसांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना रविवारी न्यायालयात हजर केले होते़ या दोघांचाही प्रत्येकी ३० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन अर्ज मंजूर करण्यात आला़ तसेच आठवड्यातील मंगळवार व शुक्रवार असे दोन दिवस लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Additional District Collector Pawar to bail out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.