परिवर्तनाच्या लाटेत युवकांना सामील करा
By Admin | Updated: July 21, 2014 01:31 IST2014-07-21T01:26:02+5:302014-07-21T01:31:40+5:30
परिवर्तनाच्या लाटेत युवकांना सामील करा

परिवर्तनाच्या लाटेत युवकांना सामील करा
नाशिक : कोणत्याही परिस्थितीत राज्यात सेनेचे १५० आमदार निवडून आणायचे यासाठी युवा सेनेच्या वतीने ‘मिशन १५०’ हाती घेण्यात आले आहे़ या परिवर्तनाच्या लाटेत तळागाळातील युवकांना सामील करून घ्या, असे आदेश युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी येथे दिले़
शिवसेनेच्या कार्यालयात मिशन १५० अंतर्गत युवा सेनेच्या झालेल्या बैठकीत ठाकरे यांनी हे आदेश दिले़ त्यांनी आज नाशिक, दिंडोरी, शिर्डी व अहमदनगर या लोकसभा मतदारसंघांतील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन मार्गदर्शन केले़
ठाकरे म्हणाले, आचारसंहिता केवळ ५० ते ६० दिवसांवर येऊन ठेपली आहे़ या अल्प काळात घर तेथे शिवसैनिक हे अभियान युवा सेनेला हाती घेऊन यशस्वी करायचे आहे़ चौकाचौकांत भगवा झेंडा फ डकला पाहिजे तसेच चौकाचौकांत युवा सेनेच्या शाखांचे उद्घाटन झाले पाहिजे़ सदस्य नोंदणी अभियानाला वेग देऊन ते महाविद्यालयांचे प्रवेशद्वार, क्लास, जीम, जॉगिंग ट्रॅक ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी नोंदणी सुरू करा़ आपल्या पदाधिकाऱ्यांनी केलेली कामे सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी वेगवेगळे वॉट्सअॅपचे गु्रप तयार करा. सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांपर्यंत कामे पोहचवा. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून नेतेगिरी न करता त्यांच्या समस्या सोडवा. सेनेच्या पदाधिकाऱ्यांची यासाठी मदत घ्या़ बूथप्रमुखापर्यंत युवा सेनेची ताकद गेली पाहिजे़ त्यांचे मदतीचे हात होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करून विधानसभेच्या तयारीला लागावे, असे आदेश त्यांनी यावेळी युवा सेनेला दिले़
याप्रसंगी युवा सेनेचे संपर्कप्रमुख शशिकांत झोरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, गटनेता सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, तसेच युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)