त्या’ सहा गावांचा पुन्हा ‘पेसा’त समावेश करा
By Admin | Updated: December 19, 2015 23:35 IST2015-12-19T23:34:51+5:302015-12-19T23:35:21+5:30
हिवाळी अधिवेशन: वाजे यांची मागणी

त्या’ सहा गावांचा पुन्हा ‘पेसा’त समावेश करा
सिन्नर: ठाणे जिल्हा विभाजनानंतर पेसा कायद्यातून वगळण्यात आलेल्या सिन्नर विधानसभा मतदारसंघातील सहा आदिवासीबहुल गावांचा पुन्हा ‘पेसा’त समावेश करण्याची मागणी आमदार राजाभाऊ वाजे यांनी हिवाळी अधिवेशनात केली.
पेसा कायद्यातून वगळल्यामुळे आदिवासी भागातील अनुसूचित क्षेत्रातील पदे रिक्त असणे, कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी असणे, स्थानिक भाषा अवगत नसणे अशा अडचणी निर्माण होतात. त्यामुळे सदर आदिवासी गावे विकासापासून वंचित राहत असल्याचे वाजे यांनी विधानसभेत आदिवासी विभागाच्या विधेयकावरील चर्चेप्रसंगी सांगितले.
समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासींचा सर्वांगीण विकास, आदिवासी भागाच्या सामाजिक, नैसर्गिक भौगोलिक संपन्नतेसाठी पेसा कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे.
आदिवासींची संस्कृती, प्रथा, परंपरा यांचे जतन आणि संवर्धन करणे, ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासीबहुल गावांतील शासन व्यवस्था बळकट करणे आदि
कामे पेसा कायद्यांतर्गत केली
जातात.
या कायद्यामुळे आदिवासी गावांतील स्थानिक युवकांनाच रोजगार दिला जातो. त्यामुळे सदर आदिवासी गावांचा विकास होण्यास हातभार लागणार असल्याने त्यांचा पेसात समावेश करण्याची मागणी वाजे यांनी केली. (वार्ताहर)