वंचितांची नावे यादीत समाविष्ट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:10 IST2021-06-22T04:10:40+5:302021-06-22T04:10:40+5:30
ब्राह्मणगाव : येथील प्रधान मंत्री आवास योजना अंतर्गत असणाऱ्या " ड " पत्रक यादीतील १४३ गरीब लाभार्थ्यांची नावे शासनाकडून ...

वंचितांची नावे यादीत समाविष्ट करा
ब्राह्मणगाव : येथील प्रधान मंत्री आवास योजना अंतर्गत असणाऱ्या " ड " पत्रक यादीतील १४३ गरीब लाभार्थ्यांची नावे शासनाकडून अचानक व चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आल्याने ती सर्व नावे या यादीत पुन्हा समाविष्ट करण्यात यावीत, तसेच ब्राह्मणगाव शेतशिवारात सिंगल फेज योजनेचे काम त्वरित मार्गी लावण्यात यावे या मागणीसाठी कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली . याप्रसंगी सरपंच किरण आहिरे, उपसरपंच बापूराज खरे, ग्रामपालिका सदस्य विनोद अहिरे,जनार्धन सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते विश्वास खरे, नितीन अहिरे, भरत अहिरे उपस्थित होते. याप्रसंगी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन भुसे यांनी शिष्टमंडळाला दिले.
----------------
विविध मागण्यांसाठीचे कृषी मंत्री दादा भुसे यांना निवेदन देताना सरपंच किरण अहिरे, उपसरपंच बापूराज खरे, विनोद अहिरे, विश्वास खरे, नितीन अहिरे आदी. (२१ ब्राह्मणगाव)
===Photopath===
210621\21nsk_18_21062021_13.jpg
===Caption===
२१ ब्राह्मणगाव