मालेगाव शिक्षक दिन जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:18 IST2021-09-06T04:18:13+5:302021-09-06T04:18:13+5:30
संगमेश्वर : मालेगाव तालुक्यातील मुंगसे येथील स्वामी विवेकानंद संस्था संचलित औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. ...

मालेगाव शिक्षक दिन जोड
संगमेश्वर : मालेगाव तालुक्यातील मुंगसे येथील स्वामी विवेकानंद संस्था संचलित औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य एम. बी. निकम, संस्थेचे सेक्रेटरी आर. आर. सूर्यवंशी, सुजीत सूर्यवंशी, विजय सूर्यवंशी, संगीता सूर्यवंशी यांची भाषणे झाली.
----
एलव्हीएच इंग्लिश मेडियम स्कूल
मालेगाव : येथील एल. व्ही. एच. इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये अध्यक्षस्थानी ए. एस. पवार होते. मुख्याध्यापक एन. ए. हिरे व उपमुख्याध्यापक एस. ए. शेवाळे यांनी प्रतिमा पूजन केले. मीनल पाटील यांनी मार्गदर्शन केले.
----
भारत विद्यालय
मालेगाव : कॅम्पातील भारत विद्यालयात अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका कल्पना अहिरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सुधा भामरे उपस्थित होत्या. सुनंदा पाटील, मनिषा साईनकर यांची भाषणे झाली. सुधाकर सनेर यांनी आभार मानले.
----
आरबीएच कन्या विद्यालय
मालेगाव : येथील आर. बी. एच. कन्या विद्यालयात अध्यक्षस्थानी उपशिक्षिका के. पी. देवरे होत्या. प्रास्ताविक माधवी नेरकर यांनी केले. श्रीमती देवरे यांनी मार्गदर्शन केले. विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी प्राचार्य प्रमिला पाटील, उपप्राचार्य सुचारिता ठाकरे उपस्थित होते.
----
या. ना. जाधव विद्यालय
मालेगाव : म. फुले शिक्षण संस्था संचलित या. ना. जाधव विद्यालयात प्राचार्य आर. डी. शेवाळे यांनी प्रतिमा पूजन केले. म. फुले पुतळ्याचे पूजन एन. एम. गायकवाड यांनी तर कर्मवीर या. ना. जाधव यांच्या पुतळ्याचे पुजन स्वाती अहिरे यांनी केले.
----
के. बी. एच. विद्यालय टाकळी
मालेगाव : तालुक्यातील टाकळी येथील के. बी. एच. विद्यालयात अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एम. पी. शिंदे होते. यावेळी विनायक निकम, तनुजा शेवाळे, दिशा निकम या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. मुख्याध्यापक शिंदे व शिक्षक डी. एस. सावंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली.
----
काबरा प्राथमिक शाळा
मालेगाव : येथील कै. ल. रा. काबरा प्राथमिक विद्यामंदिरात अध्यक्षस्थानी शिक्षिका मीनाक्षी पगारे होत्या. खुशी निकम, श्रद्धा गवळी, शुभम पाटील, माधुरी गवळी, नयन अहिरे या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. सुनील शर्मा, मुख्याध्यापक संजय शिंदे, मीनाक्षी पगारे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सीमा पवार यांनी केले. गौरी परदेशी यांनी आभार मानले.
----