शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

घालाल धिंगाणा, तर कारवाईचा नजराणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 00:42 IST

Maharashtra Assembly Election 2019 विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि.२४) होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागात सर्वत्र चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. निमलष्करी दलाच्या सशस्त्र जवानांसह दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथके मतदारसंघात गस्तीवर राहणार आहेत.

नाशिक : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि.२४) होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागात सर्वत्र चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. निमलष्करी दलाच्या सशस्त्र जवानांसह दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथके मतदारसंघात गस्तीवर राहणार आहेत. दुचाकींच्या पुंगळ्या काढून हेतुपुरस्सर शहराची ‘हवा’ बिघडविणाऱ्यांना थेट दीपावलीच्या तोंडावर तुरुंगाची हवा खावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. कार्यकर्त्यांकडून जल्लोषाच्या नावाखाली केली जाणारी कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी खपवून घेतली जाणार नसल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी स्पष्ट केले आहे.मतमोजणीप्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुज्ञपणे वागावे. विजयाचा जल्लोष आपल्यापुरता मर्यादित ठेवावा, जेणेक रून इतरांना त्याचा कोणत्याही प्रकारे त्रास सहन करावा लागणार नाही आणि शहरासह जिल्ह्याच्या कायदासुव्यवस्थेला कुठलीही बाधा येणार नाही, याची प्रत्येकाने खबरदारी घेण्याचे आवाहन नांगरे पाटील व सिंह यांनी केले आहे. दुचाकींच्या पुंगळ्या काढून मिरविणे, पराभूत उमेदवारांच्या दारात जाऊन धिंगाणा घालणे, त्यांच्या निवासस्थानांच्या परिसरात पुंगळ्या काढलेल्या दुचाकी भरधावपणे फिरविणे, गुलालाची उधळण करणे, आक्षेपार्ह घोषणा देऊन आपापसांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाºया कार्यकर्त्यांना तुरुंगात दीपावलीचा सण साजरा करावा लागू शकतो, असे पोलीस प्रशासनप्रमुखांनी म्हटले आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेला कुठलाही धोका आपल्या वर्तणुकीमुळे होणार नाही, याची काळजी कार्यकर्त्यांनी व त्यांच्या  नेत्यांनी घेण्याची गरज असल्याचे नांगरे पाटील यांनी सांगितले. शहरासह जिल्ह्यातील सर्व भागात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.शहरात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे चार कंपन्या तर जिल्ह्यात केंद्रीय राखीव सशस्त्र पोलीस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलासह राज्य राखीव दलाच्या सुमारे ७ तुकड्या बंदोबस्तावर आहेत. मतमोजणी केंद्रांच्या परिसरात कुठलाही गोंधळ तसेच शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपºयात जल्लोषाच्या नावाखाली घातला जाणारा धिंगाणा पोलीस प्रशासन खपवून घेणार नसल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे मतमोजणी सुरू असताना तसेच निकालानंतर धिंगाणा घालणाºयांवर कडक कारवाई होणार आहे.

नाशिकचा नावलौकिक राखानाशिकचा नावलौकिक व संस्कृती कायम राखली जावी. पूर्ववैमनस्यातून कुठल्याही प्रकारचा वाद उकरून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची पोलिसांकडून गय केली जाणार नसून तसे आदेश बंदोबस्तावरील सर्व अधिकाºयांना देण्यात आल्याचे नांगरे पाटील व सिंह यांनी दिले. आपल्या विजय संयमाने व शांततेत साजरा करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019PoliceपोलिसElectionनिवडणूकNashikनाशिक