शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चंदनचोरांची टोळी सक्रिय; तीन वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 00:33 IST

मागील काही दिवसांपासून शहर व परिसरात चंदनचोरांची टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. पंधरवड्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या आवारातून चोरट्यांनी चंदनाचे वृक्ष कापून नेले होते.

नाशिक : मागील काही दिवसांपासून शहर व परिसरात चंदनचोरांची टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. पंधरवड्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या आवारातून चोरट्यांनी चंदनाचे वृक्ष कापून नेले होते. या घटनेचा तपास पूर्ण होत नाही तोच पुन्हा त्र्यंबकरोडवरील ‘गुलमोहर’ या शासकीय बंगल्याच्या आवारातून दोन तर भारतीय सैन्यदलाच्या गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट््स) व भारतीय तोफखाना केंद्राच्या आवारात घुसखोरी करून येथील चंदनाचा वृक्ष अज्ञात चोरट्यांनी कापून लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.चंदनवृक्ष शहर व परिसरात केवळ शासकीय निवासस्थाने व वसाहतींमध्ये बहरलेली असून, त्या वृक्षांवर चोरट्यांच्या टोळीने वक्रदृष्टी केली आहे. विशेष म्हणजे सरकारी आस्थापनांभोवती सुरक्षाव्यवस्था चोख असतानाही रात्रीच्या अंधारात चोरट्यांकडून चंदनाचे भलेमोठे वृक्ष सहजरीत्या कापून लंपास केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सैन्यदलाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या कॅट््सच्या आवारात घूसखोरी करण्याचे धाडस चंदनचोरांकडून केले गेल्याने संताप व्यक्त होत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानले जाणारे सैन्याचे महत्त्वाचे प्रशिक्षण केंद्र गांधीनगर व जयभवानी रोड परिसरात आहे. चोरट्यांनी या केंद्रात जयभवानीरोड नाशिकरोड परिसरातून प्रवेश करत रेकार्ड अधिकारी मेसजवळील चंदनवृक्ष कापले. मुळापासून फांद्यापर्यंतचा सुमारे पाच हजार रुपये किमतीचा चंदनवृक्षाचा बुंधा चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी विष्णू सोलंकी (३६, रा. तोफखाना केंद्र) यांनी फिर्याद दिली आहे.दुसऱ्या घटनेत त्र्यंबक रस्त्यावरील ‘गुलमोहर’ या शासकीय निवासस्थानाच्या आवारात प्रवेश करून चोरट्यांनी दोन चंदनवृक्षांची कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी या घटनेत सुमारे दहा हजार रुपये किमतीचे चंदनवृक्षांचे दोन बुंधे मुळापासून कापून लंपास केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी