मास्कची चढ्या दराने विक्र ी करणार्यांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 01:37 IST2020-10-25T00:56:36+5:302020-10-25T01:37:46+5:30
नाशिक : कोरोनामुळे आता सर्वसामान्य नागरिकांची गरज ठरलेल्या मास्कची चढ्या दराने विक्र ी होत असल्याचे राज्यस्तरावर ‘लोकमत’ने निदर्शनास आणल्यानंतर अखेरीस राज्य शासनाने त्याचे दर निश्चित केले आहेत. मात्र, त्यानंतरही त्यानुसारच कार्यवाही होते किंवा नाही, याची पडताळणी औषध दुकानांमधून केली जाणार आहे. शासन निर्धारित दरापेक्षा अधिक दर आकारल्यास संबंधित दुकानदारांवर कारवाई होणार आहे.

मास्कची चढ्या दराने विक्र ी करणार्यांवर होणार कारवाई
नाशिक : कोरोनामुळे आता सर्वसामान्य नागरिकांची गरज ठरलेल्या मास्कची चढ्या दराने विक्र ी होत असल्याचे राज्यस्तरावर ‘लोकमत’ने निदर्शनास आणल्यानंतर अखेरीस राज्य शासनाने त्याचे दर निश्चित केले आहेत. मात्र, त्यानंतरही त्यानुसारच कार्यवाही होते किंवा नाही, याची पडताळणी औषध दुकानांमधून केली जाणार आहे. शासन निर्धारित दरापेक्षा अधिक दर आकारल्यास संबंधित दुकानदारांवर कारवाई होणार आहे.
गेल्याच आठवड्यात राज्य शासनाने मास्कच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी दर निश्चित केले आहेत. त्यानुसार शासनाने आदेश जारी केले असून, आता तीन रु पयांपासून 127 रु पयांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे मास्क मिळू शकतील. सर्वाधिक वापरले जाणारे ‘टु लेअर सिर्जकल’ मास्क आता तीन रु पयांना तर ‘ट्रीपल लेअर’ मास्क चार रु पयांना मिळणार आहेत. याशिवाय वेगवेगळे प्रकारचे‘‘एन-95’ मास्कमधील वेगवेगळ्या प्रकारातील मास्कदेखील आता 29 ते 49 रु पये या दरात मिळणार आहेत.
राज्य शासनाने दर निश्चित केले असले तरी त्यानुसार खरोखरीच विक्र ी होत आहे किंवा नाही याची तपासणी करण्याचे आदेश राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त ए. आर. काळे यांनी दिले आहेत. सर्व विभागीय सहआयुक्तांना यासंदर्भात आदेशित करण्यात आले आहे. येत्या सात दिवसांत औषध निरीक्षकांनी सुमारे 70 ते शंभर किरकोळ औषध विक्र ेत्यांकडे तर प्रत्येक सहायक आयुक्तांनी वीस ते पंचवीस किरकोळ औषध विक्र ेत्यांकडे नोज मास्कची विक्र ी योग्य दराने होत आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मनमानी पद्धतीने मास्कची विक्र ी करणार्यांना दणका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.