शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मनुष्यबळाची माहिती न देणाऱ्या अस्थापनावर कारवाईचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 15:38 IST

केंद्र व राज्य सरकारसह विविध शासकीय, निमशासकीय तथा खासगी क्षेत्रातील २५ पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असलेल्या आस्थापनांनी त्यांच्या मनुष्यबळाविोषयीचे तिमाही विवरण ३० एप्रिलपर्यंत महास्वयंम संकेतस्थळावर सादर करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास तथा  रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालकांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून केले असून असे विवरणपत्र सादर न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाईही होऊ शकते,  असा इशाराही या प्रसिद्धिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आला अहे. 

ठळक मुद्दे 31 मार्चच्या तिमाहीतील मनुष्यबळ विवरण सादर करा जिल्हा रोजगार सहायक संचालकांचे आस्थापनांना आवाहन

नाशिक : केंद्र व राज्य सरकारसह विविध शासकीय, निमशासकीय तथा खासगी क्षेत्रातील २५ पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असलेल्या आस्थापनांनी त्यांच्या मनुष्यबळाविोषयीचे तिमाही विवरण ३० एप्रिलपर्यंत महास्वयंम संकेतस्थळावर सादर करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास तथा  रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालकांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून केले असून असे विवरणपत्र सादर न करणाऱ्या अस्थापनांवर कारवाईही होऊ शकते,  असा इशाराही या प्रसिद्धिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आला अहे.  सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र शासन व राज्य शासनाची सर्व कार्यालये, अंगिकृत उद्योग, व्याववसाय स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद /पंचायत समिती महानगर पालिका नगरपालिका तसेच खासगी क्षेत्रातीस २५ किंवा त्यापेक्षा अधिक कामगार असलेल्या आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यावसाय, कारखाने यांना सेवायोजन कार्यालये तथा रिक्त पदे घोषिक करण्याची सक्ती करणारा  कायदा १९५९ व त्यातील १९६०च्या तरतुदींनुसार  त्रैमासिक विवरण पत्र तिमाही संपल्यानंतर  ३० दिवसांच्या आत म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत  सादर करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास तथा  रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक संपत चाटे यांनी  यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार  व उद्योजक ता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाचा सर्व नियोक्त्यांचा पूर्वीच्या महारोजगार वेबपोर्टलवरील डाटा महास्वयंम या नविन वेबपोर्टलवर मायग्रेट करण्यात आलेला असून  तिमाही विविरणपत्र इआर-१ सादर करणयची सुविधा या वेबपोर्टलवर दि.१ जुलै २०१७पासून उपलब्ध करून  देण्यात आली आहे. या वेबसाईटवर ही माहीत अपलोड करणे आवश्यक असल्याने ३० एप्रिलपर्यंत ही माहिती उपलब्ध करून देण्याचे आवाहन सहायक संचालक कार्यालयाकांकडून करण्यात आले आहे.  या कार्यवाहीत अडचण आल्यास त्याचप्रमाणे अधिक माहिती मिळविण्यासाठी  कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात अले आहे. सेवायोजन कार्यालये तथा रिक्त पदे घोषिक करण्याची सक्ती करणारा  कायदा १९५९ व त्यातील १९६० मधील तरतुदींनुसार २५ किंवा त्यापेक्षा अधिक मनुष्यबळ असलेल्या सर्व शासकीय व खासही अस्थापनांनी ३१ मार्च २०१९ तिमाहि अखेर त्यांच्या वेतनपटावर मनुष्यबळाची माहिती ईआर-१ वरील वेबसाईटवर आॅनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. यात कसूर करणाºया कसूरदार अस्थापनांवर कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशाराही   जिल्हा कौशल्य विकास तथा  रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक संपत चाटे यांनी  केले आहे. 

टॅग्स :Employeeकर्मचारीNashikनाशिकbusinessव्यवसाय