मुखेडफाटा येथे विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 17:29 IST2019-02-02T17:27:36+5:302019-02-02T17:29:02+5:30
देशमाने : हेल्मेटसक्ती मोहिमेंतर्गत येवला तालुका ग्रामीण पोलिसांच्यानी मुखेड - फाटा येथे २९ वाहनचालकांवर कारवाई करत १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मुखेडफाटा येथे विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई
ठळक मुद्दे२९ वाहनचालकांवर कारवाई करत १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
देशमाने : हेल्मेटसक्ती मोहिमेंतर्गत येवला तालुका ग्रामीण पोलिसांच्यानी मुखेड - फाटा येथे २९ वाहनचालकांवर कारवाई करत १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
यामध्ये १४ विना हेल्मेट दुचाकीस्वार व सीटबेल्ट न लावलेल्या १५ कारचालकावर समज देऊन दंडात्मक कारवाई करण्यात आली.
दरम्यान, १ फेब्रुवारी पासून हेल्मेटसक्ती सुरु झाल्याने अनेक दुचाकीस्वार हेल्मेट परिधान करून वाहन चालवत असल्याचे आढळून आले. तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामनाथ तांदळकर, पोलीस नाईक अरु ण गंभिरे, योगेश पाटोळे, पोलिस कॉन्टेबल संदीप पगार आदी सहभागी झाले होते.
(फोटो ०१ देशमाने)