गौणखनिजचोरीबद्दल दोन ट्रकवर कारवाई
By Admin | Updated: July 8, 2014 23:59 IST2014-07-07T23:55:24+5:302014-07-08T23:59:01+5:30
गौण खनिजाची चोरी करून त्याची शहरामध्ये विक्री करण्याचा गोरखधंदा करणार्या दोन ट्रक चालक व मालकांवर महसुलच्या पथकाने कारवाई केली.

गौणखनिजचोरीबद्दल दोन ट्रकवर कारवाई
वाशिम :: शहर परिसरामधून राजरोसपणे गौण खनिजाची चोरी करून त्याची शहरामध्ये विक्री करण्याचा गोरखधंदा करणार्या दोन ट्रक चालक व मालकांवर महसुलच्या पथकाने कारवाई केली. या कार्यवाहीमध्ये ट्रक मालकांकडून १५ हजार रूपये दंड वसुल करण्यात आला. ही कारवाई रविवार ६ जुलै रोजी करण्यात आली. वाशिम तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी गौण खनीजाची चोरी होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. या अनुषंगाने तहसिलदार आशिष बिजवल यांनी सुटीचा दिवस रविवारीसुध्दा महसुल अधिकारी व कर्मचार्यांचा समावेश असलेल्या पथकाला कार्यवाहीच्या सुचना दिल्या. महसुल पथकाचे प्रमुख नायब तहसिलदार विजय खेडकर, तलाठी पी.आर. वैद्य व तलाठी के.एल. अवचार यांनी सिव्हील लाईन परिसरामधून हुसेन जानीवाले यांचे मालकीचा ट्रक २ ब्रास गिट्टीची वाहतुक करताना पकडला. तर, हिंगोली मार्गावर सुधाकर बर्वे यांच्या मालकीचे ट्रॅक्टर एक ब्रास रेतीची वाहतुक करताना आढळून आले. या दोघांकडून प्रशासनाने १५ हजार रूपये दंड वसुल केला.