गण्या कावळेवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई
By Admin | Updated: January 31, 2016 00:17 IST2016-01-31T00:16:48+5:302016-01-31T00:17:40+5:30
गण्या कावळेवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई

गण्या कावळेवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई
नाशिक : जबरी चोरी, खंडणी, दरोडा, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार गणेश सुरेश वाघ ऊर्फ गण्या कावळ्यावर पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायदा कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली आहे़
२०११ ते २०१५ या कालावधीत सराईत गुन्हेगार गणेश सुरेश वाघ ऊर्फ गण्या कावळेवर (२५, रा़एन ५१/ एस २/१८/८, राजरत्ननगर, सिडको सध्या राहणार हनुमानवाडी मोरे मळा ) अंबड, सिडको, औद्योगिक वसाहतीत जबरी चोरी, खंडणी, दरोडा व खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत़
याबरोबरच कळवा पोलीस ठाण्यात दरोड्याची तयारी व कट्टा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून, सिडकोतील नागरिक त्याच्या दहशतीखाली होते़ गेल्यावर्षी शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांंच्यावर खंडणीसाठी कावळे यांनेच हल्ला केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी गण्या कावळेवर वारंवार प्रतिबंध कारवाई करूनही तो आदेशाचे वारंवार उल्लंघन करीत असल्याने पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी त्याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली आहे़ (प्रतिनिधी)