शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

घरपट्टी वसुलीसाठी जप्ती वॉरंटसह कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:52 IST

मार्च अखेरमुळे महापालिकेने घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी धडाका लावला असून, आतापर्यंत १०९ कोटी रुपयांची विक्रमी वसुली झाली आहे.

नाशिक : मार्च अखेरमुळे महापालिकेने घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी धडाका लावला असून, आतापर्यंत १०९ कोटी रुपयांची विक्रमी वसुली झाली आहे. मार्च अखेरीस अवघे पाच दिवस शिल्लक असताना उद्दिष्टपूर्ती होत नसल्याने महापालिकेने आता जप्ती वॉरंटसह अन्य कारवायांना सुरुवात केली असून, पाच दिवसांत किमान सहा कोटी रुपये वसूल होतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. महापालिकेची कारवाई टाळण्यासाठी विविध प्रकारचे व्यावसायिक, मिळकतधारक महापालिकेत अधिकारी वर्गाकडे धाव घेत असून, कारवाई टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.चालू आर्थिक वर्षासाठी महापालिका आयुक्तांनी सुमारे २५६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट घरपट्टीसाठी ठेवले होते; परंतु जुन्या मिळकती करवाढीच्या प्रस्तावात महासभेने घट करून सर्व प्रकारच्या मिळकतींना सरसकट सोळा टक्के कर आकारणी करण्याचा ठराव केला. त्यातच माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नव्या मिळकतींवर कर वाढविण्यासाठी वार्षिक भाडेमूल्य वाढविले आणि त्यांनतर मोकळ्या बखळ जागांचेदेखील दर वाढविले. तसेच मिळकतीचे सामासिक क्षेत्र, वाहनतळ आणि शेतीक्षेत्रावर करवाढ लागू केली. त्याचप्रमाणे महापालिकेने खासगी एजन्सीमार्फत केलेल्या सर्वेक्षणात आढळलेल्या ५९ हजार मिळकतींकडून नवीन भाडेमूल्यानुसार कर आकारणी केली जाणार होती; परंतु या सर्व बाबींना वर्षभर विरोध होत राहिला. त्यातच वार्षिक भाडेमूल्य आकारणीच्यालॉन्स, वीटभट्टीचालकांना नोटिसामहापालिकेने अलीकडेच मूल्यांकन करून लॉन्स, लाकडाच्या वखारी आणि वीटभट्टी व्यावसायिकांना दहा ते वीस लाख रुपयांच्या नोटिसा बजावल्या. त्यात मूल्यांकनाच्या अगोदर सहा वर्षे कालावधीपर्यंत वसूल करण्याच्या नादात ज्यावेळी संबंधित व्यवसाय होत नव्हते त्यांनादेखील नोटिसा बजावल्याचे काहींचे म्हणणे असून, त्यामुळे त्यांनी महापालिकेत कर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, वसुलीच्या वेळी चुकीच्या कर आकारणीत दुरुस्ती करण्याचे प्रस्ताव येत असून, ते प्रशासनाकडून फेटाळण्यात येत आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTaxकर