वाळू साठ्यावर कारवाई
By Admin | Updated: February 4, 2016 23:03 IST2016-02-04T23:03:14+5:302016-02-04T23:03:41+5:30
गुन्हा दाखल : लेखानगर, अंबडला साठा जप्त

वाळू साठ्यावर कारवाई
नाशिक : शहरात बेकायदेशीररीत्या वाळूची वाहतूक व साठा करणाऱ्यांविरुद्ध महसूल खात्याने मोहीम हाती घेतली असून, लेखानगर येथील बहुचर्चित चौकात, तसेच अंबड औद्योगिक वसाहतीत छापा मारून मोठ्या प्रमाणावर वाळूचा साठा जप्त केला.
गुरुवारी दुपारी अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, प्रांत अधिकारी मंजूलक्ष्मी, गौणखनिज अधिकारी गणेश राठोड यांनी लेखानगर येथे ओळीने रांगेत उभ्या असलेल्या मालट्रकची चौकशी केली असता त्यातील पाच मालट्रकमध्ये वाळू भरल्याचे तर बारा मालट्रक रिकामे असल्याचे आढळून आले. संबंधित ट्रक मालकांकडे वाळू उत्खननाच्या पावत्या मागितल्या असता, त्यांनी दिलेल्या पावत्या बनावट असल्याचे लक्षात येताच यासंदर्भात इंदिरानगर पोलिसांना पाचारण करण्यात येऊन वाळूने भरलेले पाचही मालट्रक जप्त करण्यात आले.