उद्यानाचे आरक्षण हटविण्यास हरकत
By Admin | Updated: July 9, 2017 00:27 IST2017-07-09T00:27:10+5:302017-07-09T00:27:23+5:30
नाशिक : पखालरोड, जनरलवैद्यनगर परिसरातील उद्यानाचे आरक्षण हटविण्यास विरोध दर्शविला आहे.

उद्यानाचे आरक्षण हटविण्यास हरकत
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पखालरोड, जनरलवैद्यनगर परिसरातील उद्यानाचे आरक्षण हटविण्यास माजी नगरसेवक गुलजार कोकणी यांनी विरोध दर्शविला आहे. त्याबाबत त्यांनी नगररचना सहसंचालकांकडे हरकत नोंदवली आहे.
शासनाने नवीन विकास आराखडा भागश: प्रसिद्ध केला आहे. त्यातील ७९ आरक्षणांबाबत हरकती मागविण्यात आल्या आहेत. विकास आराखड्यात पखालरोडवरील जनरल वैद्यनगरातील आरक्षण क्रमांक १८७ मधील उद्यानाचे आरक्षण हटवत रहिवासी विभागासाठी भूखंड खुला करण्याचे प्रस्तावित आहे. सदर आरक्षण हटविण्यास माजी नगरसेवक गुलजार कोकणी यांनी हरकत घेतली असून, परिसरात एकही उद्यान नसल्याने आणि यापूर्वीही उद्यानांचे आरक्षण रद्द केले असल्याने सदर उद्यानाचे आरक्षण कायम ठेवण्याची मागणी केली आहे.