शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

तस्करी रोखण्याचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 00:21 IST

नाशिक : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, मागील दहा दिवसांमध्ये राज्य उत्पादन शुल्क नाशिक अधीक्षक कार्यालयाकडून अवैध मद्याची वाहतूक केल्याप्रकरणी ९१ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे १४ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ठळक मुद्देउत्पादन शुल्क विभाग : मद्यासह १५ लाखांचा मुद्देमाल जप्त; ९१ गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, मागील दहा दिवसांमध्ये राज्य उत्पादन शुल्क नाशिक अधीक्षक कार्यालयाकडून अवैध मद्याची वाहतूक केल्याप्रकरणी ९१ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे १४ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परराज्यातून शहरात येणाऱ्या विविध तालुक्यांमधील रस्त्यांवर विधानसभा निवडणूक कालावधीत करडी नजर ठेवली जात आहे. विशेषत: गुजरात, दमण-दीव, दादरानगर हवेली यांसारख्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये निर्मित केले जाणारे मद्य राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित आहे. या प्रकारच्या मद्याची वाहतूक चोरट्या मार्गाने शहरापर्यंत केली जाते. विधानसभा निवडणूक कालावधीत याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. मनोहर अंचुळे यांनी विशेष नियोजनाची आखणी केली असून, सर्व सीमा तपासणी नाके पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहेत. मद्याची तस्करी रोखण्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे.आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येणारी गुन्हे अन्वेषण व मद्यविक्रीची दैनंदिन माहिती क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून घेत दररोज सकाळी विशेष संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जात आहे. त्यानुसार माहिती लेखी स्वरूपात भरून निवडणूक आयोगाला सादर केली जाणार असल्याचे अंचुळे यांनी सांगितले. संशयित मद्य तस्करींच्या ठिकाणांवरही राज्य उत्पादन शुल्क विभाग लक्ष ठेवून आहे.‘ड्राय-डे’मध्ये विक्री करणारे रडारवरमागील तीन वर्षांमध्ये ‘ड्राय-डे’च्या दिवशीदेखील परवानाधारक मद्यविक्रेत्यांपैकी काही विक्रेत्यांनी सर्रासपणे मद्याची मागील दरवाजाने विक्री केल्याच्या तक्रारी राज्य उत्पादन शुल्क विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार असे संशयित परवानाधारक मद्यविक्रेते विभागाच्या ‘हिटलिस्ट’वर असून त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्यावर वॉच ठेवून विशेष गोपनीय पथक याबाबत सतर्क आहे. तसेच पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षकांकडूनदेखील अवैध मद्यवाहतूक व विक्री करणाºयांची माहिती मागविण्यात आली आहे.१५ विशेष भरारी पथकेविधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून शहरासह जिल्ह्णात १५ विशेष भरारी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत सातत्याने सीमावर्ती भागावर लक्ष ठेवून सीमा नाक्यांवर वाहनांची तपासणी केली जात आहे. अद्याप ९१ गुन्हे अवैध मद्यवाहतूक प्रकरणी दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी