पिंपळगाव ग्रामपंचायतीची थकबाकीदारांवर कारवाई

By Admin | Updated: February 16, 2016 23:17 IST2016-02-16T23:13:16+5:302016-02-16T23:17:53+5:30

पिंपळगाव ग्रामपंचायतीची थकबाकीदारांवर कारवाई

Action for the Pimpalgaan Gram Panchayat Offloaders | पिंपळगाव ग्रामपंचायतीची थकबाकीदारांवर कारवाई

पिंपळगाव ग्रामपंचायतीची थकबाकीदारांवर कारवाई

पिंपळगाव बसवंत : येथील ग्रामपंचायतीने थकबाकीदारांवर आता थेट धडक कारवाई करीत दुकाने सील करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
शहरातील गाळा तसेच टपरी भाड्यापोटी ४० ते ४५ नोटिसा पाठवूनही व्यावसायिक प्रशासनाला थकबाकी भरण्याकामी योग्य ते सहकार्य करत नाही. १० वर्षांपासून काही व्यावसायिकांनी थकबाकी भरलेली नाही. ४० ते ४५ लाखांची रक्कम येणे बाकी असताना प्रशासनाचा गाव विकासासाठी लागणारा खर्च हा न परवडणारा झाला आहे. दोन वर्षांपर्यंत प्रशासनाने भाडे भरण्यासाठी सूट दिली आहे. दोन वर्षापासून थकबाकीदारांवर कारवाई करीत दुकाने सील करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. या धडक कारवाईमुळे अनेक व्यावसायिकांचे थाबे दणाणले आहेत.
पिंपळगाव ग्रामपंचायत प्रशासनाने थकबाकी वसुलीची कारवाई करणे योग्यच आहे. दुकान मालक मासिक ४ ते ५ हजार रुपये भाडे घेऊन हजारो रुपये
कमवित आहेत. मात्र प्रशासनाला वर्षाकाठी तीन हजार रुपये भरत नाही. १० वर्ष पट्ट्या भरत नाही. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला.(वार्ताहर )
दुकाने सील करताना ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम.

Web Title: Action for the Pimpalgaan Gram Panchayat Offloaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.